Mumbai Train Status : कळवा फाटक उघडे राहिल्याने मध्य रेल्वे अर्धा तास रखडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 05:31 IST2019-09-18T05:31:07+5:302019-09-18T05:31:14+5:30
पूर्व-पश्चिमेकडील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी उघडलेले कळवा-खारेगाव येथील रेल्वे फाटक वेळेत बंद न झाल्याने, मंगळवारी सकाळच्या सुमारास अर्धा तास ‘मरे’ रखडली.

Mumbai Train Status : कळवा फाटक उघडे राहिल्याने मध्य रेल्वे अर्धा तास रखडली
ठाणे : पूर्व-पश्चिमेकडील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी उघडलेले कळवा-खारेगाव येथील रेल्वे फाटक वेळेत बंद न झाल्याने, मंगळवारी सकाळच्या सुमारास अर्धा तास ‘मरे’ रखडली. यामुळे धिम्या मार्गावरील अप-डाउन या दोन्ही मार्गांवर लोकल गाड्या रांगेत उभ्या होत्या.
कळवा-खारेगाव येथील फाटक मंगळवारी सकाळी ९.३७ वाजण्याच्या सुमारास उघडण्यात आले. यावेळी पूर्व-पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या अचानक वाढल्याने रेल्वे फाटक बंद होण्यास विलंब होत होता. त्यातून १० वाजण्याच्या सुमारास ते अखेर बंद झाल्यावर रेल्वे वाहतूक सुरळीत झाली. ते बंद न होत नसल्याने अप-डाउन या धिम्या मार्गावर एकामागून एक अशा तीन ते चार गाड्या रांगेत उभ्या राहिल्याने आजही प्रवाशांना लेटमार्कला सामोरे जावे लागले. एका रेल्वेच्या अधिकाºयाने हे फाटक बंद न झाल्याने मरे २० ते २५ मिनिटे थांबली होती.
>मालगाडीतील बिघाडामुळे २५ मिनिटे हार्बर ठप्प हार्बर मार्गावरील कुर्ला स्थानकाजवळ मंगळवारी दुपारी २.५० च्या
सुमारास तेल घेऊन जाणाºया मालगाडीमध्ये बिघाड होऊन मालगाडी बंद पडली. त्यामुळे कुर्ला ते पनवेल लोकल सेवा ठप्प झाली. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने ठाणे मार्गे ट्रान्सहार्बर मार्गाने जाण्याच्या सूचना प्रवाशांना देण्यात आल्या.
मालगाडी सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेला २५ मिनिटे लागली. त्यानंतर हार्बर मार्गावरील लोकल सेवा सुरू झाली. त्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल रात्रीपर्यंत उशिराने धावत होत्या.