कळवा रु ग्णालयाला हवीय सुरक्षा, रु ग्णालय प्रशासनाने केली पालिका आयुक्तांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 03:59 PM2020-05-18T15:59:21+5:302020-05-18T15:59:43+5:30
एकीकडे कळवा रुग्णालयात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे, तर दुसरीकडे या रुग्णालयाची सुरक्षा देखील आता चिंतेचा विषय झाली आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असल्याने येथे ८१ पैकी केवळ १५ सुरक्षा रक्षकच सध्या येथे कार्यरत आहेत.
ठाणे : कळवा येथील ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयावर रु ग्णांचा मोठा भार आहे. त्यामुळे येथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे ८१ जवान रु ग्णालयाची सुरक्षा करत आहेत. परंतु कोरोनामुळे सध्या रु ग्णालयात फक्त १५ सुरक्षा रक्षकच उपलब्ध राहत असल्याने या रु ग्णलयात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या सुरक्षेसाठी ठाणे महानगरपालिकेची स्वत:ची सुरक्षा रक्षक यंत्रणा आहे. मात्र ही संख्या कमी असल्याने ठाणे महानगरपालिकेने ठेकेदारी पद्धतीवर महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे ६७४ आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे १५५ सुरक्षा रक्षक नेमले आहेत. हे सर्व सुरक्षा रक्षक ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्तेची आणि सुविधा विभागांची सुरक्षा करतात. सध्या कोरोनाचा संसर्ग ठाण्यात वेगाने पसरत असल्याने पालिकेने तयार केलेल्या भार्इंदर पाडा, कासारवडवली या ठिकाणच्या क्वारोन्टाइन विभागाची सुरक्षा करत आहेत. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णलयात ठाणे जिल्हा सामान्य रु ग्णालयातील रु ग्ण हलविण्यात आले असल्याने पालिकेच्या या रु ग्णालयावर मोठा ताण वाढला आहे. या रु ग्णालयाची जबाबदारी महाराष्ट्र सुरक्षा बलावर सोपविण्यात आली आहे. मात्र कोरोना संसर्गामुळे रोज सुमारे निम्म्याहून जास्त रु ग्ण गैरहजर रहात असल्याचे दिसते आहे. १ जानेवारीपासून या रु ग्णालयाच्या सुरक्षेची जबाबदारी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या ८१ जवानांवर सोपविण्यात आली आहे. मात्र सद्यस्थितीत येथे फक्त १५ ते १६ सुरक्षा रक्षक उपास्थित आहेत. रु ग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. प्रतिभा सावंत यांनी याबाबत पालिका आयुक्त विजय सिंघल यांना पत्र पाठवून १६ मे रोजी रु ग्णालयात पिहल्या सत्रात केवळ १५ सुरक्षा रक्षक हजर असून त्यातील ३ सुरक्षा रक्षकांना अतिरिक्त कर्तव्यासाठी थांबविण्यात येत असून ३ जणांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे सुरक्षा अभावी या रु ग्णालयाची सुरक्षा धोक्यात येऊ शकते, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती डॉक्टरांना वाटते आहे. त्यामुळे पालिकेने येथील सुरक्षा त्वरीत वाढवावी अशी विनंती डॉ. प्रतिभा सावंत यांनी पालिका आयुक्त सिंघल यांचेकडे केली आहे.