सेनेला आंदोलनात अडकवणार?, विनापरवानगी आंदोलनाचा अहवाल वरिष्ठांना सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 01:25 AM2017-10-04T01:25:28+5:302017-10-04T01:26:30+5:30
मीरा रोड आणि भार्इंदर रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर बसलेल्या फेरीवाल्यांना हटवण्यासाठी शिवसेनेने सोमवारी भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या हद्दीत केलेले आंदोलन विनापरवानगी होते...
भार्इंदर : मीरा रोड आणि भार्इंदर रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर बसलेल्या फेरीवाल्यांना हटवण्यासाठी शिवसेनेने सोमवारी भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या हद्दीत केलेले आंदोलन विनापरवानगी होते, अशा दावा करत रेल्वे सुरक्षा बलाने त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर केला आहे. या बेकायदा आंदोलनाच्या आधारे शिवसेनेला अडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा त्या पक्षाचा दावा आहे.
एल्फि न्स्टन रोडच्या पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर तशी घटना मीरा रोड व भार्इंदर रेल्वे स्थानकातील पुलावर होऊ नये, हा रेल्वे परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी शिवसेनेने आ. प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी आंदोलन करण्यात आले. शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी फेरीवाल्यांना गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी केल्याचे सांगण्यात आले. परंतु रेल्वे स्थानक व पादचारी पुलावर फेरीवाले बसतच नसल्याचा दावा रेल्वे सुरक्षा बलाकडून करण्यात आला. उत्तर दिशेकडील पुलाच्या बाजुला फेरीवाले बसत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार पालिकेचा असल्याचा दावा संबंधित अधिकाºयांनी केला. फेरीवाले नसतानाही काही बोगस फेरीवाल्यांना तेथे आंदोलनापूर्वी बसविण्यात आल्याचा दावा रेल्वेच्या सुत्रांनी केला. त्यांनाच फेरीवाले भासवुन रेल्वेच्या हद्दीत विनापरवानगी आंदोलन छेडल्याचा दावाही सुरक्षा बलाने केला.
शिवसेनेने भार्इंदर स्थानकातील पादचारी पुलावर घोषणाबाजी सुरु करुन आंदोलन छेडले. ते बेकायदा असून रोखण्याचा प्रयत्न करणाºया सुरक्षा बलाच्या अधिकाºयालाही धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाला. हा प्रकार काही वृत्तवाहिन्यांवर दाखविण्यात आल्याने सुरक्षा बलाने त्याचा सविस्तर अहवाल सोमवारीच वरिष्ठांकडे पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले.
शिवसेनेने मात्र या आंदोलनाची पूर्वकल्पना रेल्वे पोलिसांना दिल्याचा दावा केला. आंदोलनादरम्यान जवानांनी शिवसेनेच्या एका नगरसेवकासह तिघांना ताब्यात घेतले होते. मात्र त्यांना काही वेळेतच सोडून देण्यात आले.
रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाºयाशी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गैरवर्तनाबाबत जवानांत संतापाचे वातावरण आहे. त्यामुले त्यांनी तातडीने या प्रकरणाचा अहवाल पुढील कारवाईसाठी वरिष्ठांना पाठवला आहे.