हाजुरी रस्ता रुंदीकरणाला विरोध करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:48 AM2021-09-09T04:48:31+5:302021-09-09T04:48:31+5:30
ठाणे : हाजुरी येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामामधील तांत्रिक अडचणी तत्काळ दूर करून रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच ...
ठाणे : हाजुरी येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामामधील तांत्रिक अडचणी तत्काळ दूर करून रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच या कामास विरोध करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश बुधवारी महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
बुधवारी महापौर म्हस्के यांनी प्रभाग क्र.१९ मधील हाजुरी येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामाची पाहणी केली. यावेळी नगरसेवक विकास रेपाळे, नगरसेविका मीनल संख्ये, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, नगर अभियंता अर्जुन अहिरे, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, अश्विनी वाघमळे, उप नगर अभियंता विनोद गुप्ता, सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, कार्यकारी अभियंता विनोद पवार तसेच इतर महापालिका अधिकारी आदी उपस्थित होते.
हाजुरी येथे ६० मीटर लांबीच्या रस्ता रुंदीकरणाचे काम प्रस्तावित होते. परंतु, पुनर्वसन व काही तांत्रिक अडचणी असल्याने स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार तो ४५ मीटरच करून तसे काम सुरू आहे. परंतु, काही स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे तसेच ट्रेनेजच्या कामासंबंधित तांत्रिक अडचणीमुळे हे काम थांबले होते. बुधवारी महापौरांनी या कामाची पाहणी करून हे काम वेळेत पूर्ण होणे गरजेचे असून नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ता लवकरात लवकर सुरू करण्यास सांगितले.