कळवा रुग्णालयातील प्रमुखांना आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 05:59 PM2020-05-05T17:59:22+5:302020-05-05T17:59:43+5:30
वागळे इस्टेट भागातील एका मृत व्यक्तीचा कोरोना अहवाल येण्यापुर्वीच त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करणाºया कळवा रुग्णालय प्रशासनाचा हा प्रकार त्यांच्या आता चांगलाच अंगलट आला आहे. महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत, संबधींत रुग्णालयाच्या प्रमुखांनाच कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
ठाणे : मृत व्यक्तीचा कोरोना अहवाल येण्यापूर्वीच महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रशासनाकडून त्याचा मृतदेह नातेवार्इंकाच्या स्वाधीन केला होता. परंतु त्यानंतर तो मयत कोरोना पॉझीटीव्ह आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सलग तिसऱ्यांदा रुग्णालय प्रशासनाकडून अशी चुक झाल्याने अखेर महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन रु ग्णालय प्रशासनाच्या प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यावर रु ग्णालय प्रशासन प्रमुख आता काय स्पष्टीकरण देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाणे येथील वागळे इस्टेटमधील इंदीरानगर भागातील हनुमाननगरमधील एका ५५ वर्षीय रु ग्णाला श्वाास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. या रु ग्णाची करोना चाचणी करण्यात आली होती. मात्र, या चाचणीचा अहवाल येण्यापुर्वीच रु ग्णालय प्रशासनाने त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला होता. परंतु आता त्याचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याने पालिका प्रशासनाची झोप उडाली आहे. या रु ग्णाच्या मृतदेहाचे अंत्यदर्शन आणि अंत्ययात्रेत अनेकजण सामील झाल्याचे बोलले जात असून यामुळे डोंगर टेकडीवर वसलेल्या दाटीवाटीच्या भागात करोनाचे संकट गडद झाल्याचे चित्र आहे. यापुर्वी रु ग्णालय प्रशासनाकडून अशाचप्रकारची चुक घडली होती आणि त्यामुळे लोकमान्यनगर भागात रु ग्ण वाढले होते. रु ग्णालय प्रशासनाकडून तिसऱ्यांदा आता चुक झाल्याने पालिका आयुक्त विजय सिंघल यांनी या प्रकरणाची दखल घेत, संबधींत रुग्णालय प्रशासनाच्या प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती पालिकेने दिली.