चिठ्ठीमुळे व्यवस्थापकाच्या आत्महत्या प्रकरणाला कलाटणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 12:28 AM2018-12-06T00:28:29+5:302018-12-06T00:28:35+5:30

विनयभंगाच्या प्रकरणातील अटकेमुळे कौटुंबिक कलहातून आत्महत्या केलेल्या रिलायन्स कंपनीचा व्यवस्थापक अभिशेषकुमार शर्मा याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमुळे या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे.

Report on the suicidal death of the manager | चिठ्ठीमुळे व्यवस्थापकाच्या आत्महत्या प्रकरणाला कलाटणी

चिठ्ठीमुळे व्यवस्थापकाच्या आत्महत्या प्रकरणाला कलाटणी

Next

- जितेंद्र कालेकर 
ठाणे : विनयभंगाच्या प्रकरणातील अटकेमुळे कौटुंबिक कलहातून आत्महत्या केलेल्या रिलायन्स कंपनीचा व्यवस्थापक अभिशेषकुमार शर्मा याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमुळे या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. आरोप करणाऱ्या महिलेमुळे आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा दावा करून पत्नी आणि सहा वर्षांचा मुलगा आपल्या मालमत्तेचे वारसदार राहतील, असे त्याने यात स्पष्ट केले आहे.
शर्माच्या आत्महत्येनंतर त्याच्या कोलशेत रोडवरील ‘लोढा अमारा’मधील पंचविसाव्या मजल्यावरील सदनिकेमध्ये पंचनामा करताना पोलिसांना चिठ्ठी मिळाल्याची माहिती एका अधिकाºयाने ‘लोकमत’ला दिली. याच चिठ्ठीमध्ये आत्महत्येचे कारण त्याने स्पष्ट केले आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअर असल्यामुळे पुण्याला चांगली नोकरी मिळाली होती. ती नोकरी सोडून अलीकडेच वाशी येथील रिलायन्स कंपनीमध्ये मोठ्या पदावर नोकरी लागली. तिथेच या २६ वर्षीय कनिष्ठ सहकारी महिलेशी चांगली ओळख झाली. तिच्याशी झालेल्या मैत्रीतूनच तिच्याबद्दल पझेसिव्हनेस निर्माण झाला. पुढे मात्र तिने विनयभंगाचा आरोप केल्यामुळे अटक झाली. पोलीस कोठडीतही राहावे लागले. एका महिलेमुळे आईवडील, पत्नी आणि मुलाला फसवल्याची भावना आहे. विनयभंगाचा आरोप करणाºया सहकारी महिलेच्या नावाचा उल्लेख करून तिच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्येचे पाऊल उचलत असल्याचे या चिठ्ठीत त्याने म्हटले आहे. शेअर्स, बँकेतील गुंतवणूक आणि रोकड अशी सुमारे एक ते दीड कोटीची मालमत्ता ही पत्नी पौर्णिमा आणि मुलाला देण्यात यावी. यामध्ये सावत्र आई आणि वडिलांचा मात्र त्याने उल्लेख केलेला नाही. पोलिसांनी त्याच्या कार्यालयातील लॅपटॉपही जप्त केला असून या लॅपटॉपमध्येच त्याने संपत्तीचा तपशील दिल्याचेही या अधिकाºयाने सांगितले.
नामांकित कंपनीमध्ये असताना महिलेकडून झालेला विनयभंगाचा आरोप, समाजात झालेली बदनामी, पोलीस कारवाई तसेच नोकरी जाण्याची भीती यातून व्यथित झाल्यामुळे जामिनावर सुटल्यानंतर घरी जातानाच त्याने आत्महत्येचा विचार केल्याची शक्यता आहे. पत्नीनेही त्याला जाब विचारून फैलावर घेतले. आईवडील, मेहुणी आणि पत्नी यांच्यासमोरच धावत घराबाहेर पडून लॉबीच्या खिडकीतून त्याने स्वत:ला झोकून दिले. हे अचानक घडल्याचे चित्र असले, तरी चिठ्ठीमुळे आत्महत्येचा विचार त्याने आधीच केल्याचे स्पष्ट झाल्याचे एका अधिकाºयाने सांगितले.
>विनयभंग प्रकरणात अबेटेड समरी
शर्माने आपल्याच पूर्वाश्रमीच्या मैत्रिणीला अश्लील मेसेज पाठवल्यामुळे त्याला विनयभंग प्रकरणात अटक झाली. आता आरोपी मृत पावल्यामुळे न्यायालयात आरोपपत्र दाखल करताना केवळ अबेटेड समरी दाखल करावी लागणार असल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाºयाने सांगितले. शर्माविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल असून कापूरबावडी पोलीस ठाण्यात त्याने आत्महत्या केल्याचा (एडीआर) गुन्हा दाखल आहे. विनयभंगाच्या गुन्ह्याचा तपास मात्र गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ मार्फत करण्यात येत आहे. मोठ्या पदावर असल्यामुळे शर्माला सुमारे दीड ते पावणेदोन लाख इतके वेतन होते. त्याची पत्नीही चांगल्या पदावर नोकरीला आहे. एरव्ही, नवी मुंबईमध्ये वास्तव्याला असलेले त्याचे आईवडील मुलगा जामिनावर सुटल्यावर त्याची समजूत घालण्यासाठी ठाण्यातील घरी आले होते. त्याच्या आत्महत्येमुळे त्यांना धक्का बसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Report on the suicidal death of the manager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.