२७ गावांच्या नगरपालिकेसंदर्भात महिनाअखेरीस अहवाल सादर होणार - रणजीत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 02:16 PM2018-07-12T14:16:30+5:302018-07-12T14:17:15+5:30
२७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेबाबत सतत पाठपुरावा करत असलेल्या सर्व पक्षीय युवा मोर्चा संघटनेने विधीमंडळ पावसाळी अधिवेशनात नागपूर येथे जाऊन दोन्ही सभागृहातील संबंधीत सदस्यांची भेट घेत निवेदन सादर केली. त्यावर नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेतल्यावर ते म्हणाले की, या महिन्याअखेरपर्यंत विभागीय आयुक्तांना हरकती सुचनांचा अहवाल सादर करण्यास अंतिम मुदत दिली आहे.
डोंबिवली: २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेबाबत सतत पाठपुरावा करत असलेल्या सर्व पक्षीय युवा मोर्चा संघटनेने विधीमंडळ पावसाळी अधिवेशनात नागपूर येथे जाऊन दोन्ही सभागृहातील संबंधीत सदस्यांची भेट घेत निवेदन सादर केली. त्यावर नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेतल्यावर ते म्हणाले की, या महिन्याअखेरपर्यंत विभागीय आयुक्तांना हरकती सुचनांचा अहवाल सादर करण्यास अंतिम मुदत दिली आहे.
सर्व पक्षीय युवा मोर्चाच्या मागणीनूसार या अध्यादेशाच्या पत्रांच्या अनूषंगाने कोकण विभागीय आयुक्तांनी लवकरात लवकर सुनावणी घेऊन शासनास अहवाल सादर करावा यासाठी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी त्यांच्या बैठकीत, तसेच आमदार संजय दत्त, आमदार जगन्नाथ शिंदे,आमदार निरंजन डावखरे आदींनी प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यासाठी नागपूरमध्ये सर्वपक्षिय युवा मोर्चाचे प्रमुख संघटक गजानन पाटील,प्रकाश पाटील, प्रेमनाथ पाटील व सामाजीक कार्यकर्ते संतोष केणे यांनी नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्यासह विविध नेत्यांची प्रत्यक्ष भेट घेतल्याचे सांगण्यात आले.