प्राथिमक आराेग्य केंद्रांना प्राप्त ‘ती’ औषधी बनावट वर्षानंतर अहवाल !
By सुरेश लोखंडे | Updated: June 8, 2024 18:54 IST2024-06-08T18:54:13+5:302024-06-08T18:54:34+5:30
जिल्हा परिषदेच्या आरेग्य विभागाकडून त्यांच्या प्राथमिक आराेग्य केंद्रांना औषधींचा पुरवठा करण्यात येताे. गेल्या वर्षी या पुरवठा करण्यात येणाऱ्या ‘स्प्युरियस’ औषधीतून तपासणीसाठी नमुने घेण्यात आले हाेते.

प्राथिमक आराेग्य केंद्रांना प्राप्त ‘ती’ औषधी बनावट वर्षानंतर अहवाल !
ठाणे : येथील जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग त्यांच्या प्राथिमक आराेग्य केंद्रांना पुरवठा करीत असलेल्या औषधांचे नमुने अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी घेतले हाेते. त्याचा तपासणी अहवाल आता एक वर्षानंतर प्राप्त झाला असता ते ‘स्प्युरियस' औषधी गाेळ्या अखेर बनावट असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यास अनुसरून संबंधित औषधी पुरवठा करणाऱ्या एजेंशीविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला, असे जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. गंगाधर परगे यांनी लाेकमतला सांगितले.
जिल्हा परिषदेच्या आरेग्य विभागाकडून त्यांच्या प्राथमिक आराेग्य केंद्रांना औषधींचा पुरवठा करण्यात येताे. गेल्या वर्षी या पुरवठा करण्यात येणाऱ्या ‘स्प्युरियस’ औषधीतून तपासणीसाठी नमुने घेण्यात आले हाेते. अन्न व औषध प्रशासनाने घेतलेल्या या औषधांचा तपासणी अहवाल आता एक वर्षाने प्राप्त झाला. त्यात या ‘स्प्युरियस’ औषधी बनावट असल्याचे उघड झाले. तपासणी अहवालात या ७८ हजार स्प्युरियस औषधी गाेळ्या बनावट असल्याचे आढळून आल्याने औषधांचा निर्माता आणि वितरकासह अन्य तीन जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी औषधांचे नमुने गोळा करून चौकशी सुरू केली हाेती. तपासणी अहवालानुसार गोळ्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले. यास अनुसरून वागळे इस्टेट पाेलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्तास डाॅ. परगे यांनी दुजाेरा दिला आहे.