पक्षी अवरोधक नेटमध्ये अडकलेल्या 8 फुटांच्या अजगराला जीवदान; असं करण्यात आलं रेस्क्यू ऑपरेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 05:46 PM2021-10-27T17:46:33+5:302021-10-27T17:47:25+5:30
Python Rescue : सर्प मित्र ज्ञानेश्वर शिरसाठ आणि चंद्रकांत कांगराळकर घटनास्थळी पोहोचताच, अडकलेला अजगर, ही मादी (Female) आहे, असे त्यांच्या लक्षात आले. ती जखमी होती. तिच्या जखमांना मेगोट्स झाले होते.
विशाल हळदे -
ठाणे- गेल्या महिनाभरापूर्वी येऊर येथील गोल्डन स्वानं क्लबयेथून सर्प मित्र ज्ञानेश्वर शिरसाठ आणि चंद्रकांत कांगराळकर यांना एक कॉल आला होता. यात, येथील पक्षी अवरोधक नेटमध्ये 7 ते 8 फुटाचा अजगर असल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर, या सर्प मित्रांनी क्षणाचाही विलंब न करता, तेथे धाव घेत त्या अजगराला वाचविले होते. यानंतर आज त्या अजगराला सुखरूप येऊर जंगलात सोडण्यात आले आहे. (Python Rescue Operation)
सर्प मित्र ज्ञानेश्वर शिरसाठ आणि चंद्रकांत कांगराळकर घटनास्थळी पोहोचताच, अडकलेला अजगर, ही मादी (Female) आहे, असे त्यांच्या लक्षात आले. ती जखमी होती. तिच्या जखमांना मेगोट्स झाले होते, तिला रेस्क्यू करून सेंट्रल पेट वेट, वर्तकनगर, ठाणे शहर येथील प्राण्यांच्या दवाखान्यात नेण्यात आले. तेथे डॉक्टर किरण शेलार यांनी तिच्यावर उपचार केले.
या अजगर बचावाच्या कामात वनविभागाचे आरएफओ गणेश सोनटक्के, वाईल्ड विभागाचे संदीप मोरे व राजन खरात यांचे सहकार्य लाभले. तसेच, जीवोहम चॅरिटेबल ट्रस्टमार्फत समाजसेवक अश्वजित गायकवाड ,चंद्रकांत कंगराळकर (जेष्ठ सर्पमित्र, ठाणे ), पोलीस नाईक प्राणीमित्र ज्ञानेश्वर शिरसाठ, सर्पमित्र निलेश सुतार यांनी त्या फिमेल अजगराला (जो शेड्यूल्ड -1 मध्ये मोडतो) आज सुखरूप येऊर जंगलात सोडले आहे.
निसर्ग आणि मानव यांचा अतूट संबंध आहे, निसर्ग चक्रातील वनस्पती, वृक्ष, प्राणी या नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन व रक्षण करणे हे मानवाचे प्रथम कर्तव्य आहे, ही जैवविविधतेची साखळी अबाधीत ठेवून मानव व मूक प्राणी यांच्यात समन्वय घडून यावा यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे, जेणेकरून बिबटे, साप हे प्राणी मानवी वस्तीत येण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, त्यांच्या अधिवासात मानवाने शिरकाव केल्याने मानव व जंगली प्राणी यांच्यात होणारे द्वंद्व थांबले पाहीजे यासाठी जनजागृती करणे व इतर बचावात्मक अभियान राबविणे मह्त्वाचे आहे.
पाहा व्हिडिओ -
ठाणे : पक्षी अवरोधक नेटमध्ये अडकलेल्या 8 फुटांच्या अजगराला जीवदान...
— Lokmat (@lokmat) October 27, 2021
विशाल हळदे -#pythonrescueoperation#pythonrescuepic.twitter.com/EG1fXJqml7