पूर्व द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या कोंडीतून ठाणेकरांची सुटका, नव्या कोपरी पूलाचे अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण 

By अजित मांडके | Published: February 9, 2023 02:28 PM2023-02-09T14:28:00+5:302023-02-09T14:28:57+5:30

Thane News: पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीचे केंद्रबिंदू ठरलेल्या कोपरी पूलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले.

Rescue of Thanekar from the dilemma on the Eastern Expressway, New Kopri bridge finally inaugurated by Chief Minister Eknath Shinde | पूर्व द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या कोंडीतून ठाणेकरांची सुटका, नव्या कोपरी पूलाचे अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण 

पूर्व द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या कोंडीतून ठाणेकरांची सुटका, नव्या कोपरी पूलाचे अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण 

googlenewsNext

- अजित मांडके

ठाणे -  पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीचे केंद्रबिंदू ठरलेल्या कोपरी पूलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. त्यामुळे मुंबई- ठाण्याच्या वेशीवर असलेल्या या पूलावर सकाळी आणि रात्रीच्यावेळेत होणाऱ्या कोंडीतून ठाणेकरांची सुटका होणार आहे. मागील चार वर्षांपासून पूलाचे काम सुरू होते. तांत्रिक अडचणी, करोनाकाळामुळे हे काम रखडले होते.

पूर्व द्रुतगती महामार्गावर हा ५+५ पदरी आहे तर ठाणे शहारातील कोपरी रेल्वे पुल हा २+२ मार्गिकांचा होता. या अरुंद रेल्वे पुलामुळे सकाळ व संध्याकाळच्या कालावधीत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. ही वाहतूक कोंडीची सोडविण्यासाठी प्राधिकरणामार्फत कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाचे रुंदीकरण व बांधकाम करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाले असून आता चार-चार पदरी मार्गिका वाहन चालकांसाठी उपलब्ध झाली. या पुलाची लांबी ७४८ मीटर तर रुंदी ३७.०४ मीटर इतकी आहे.

ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर प्रवाशांची वाहतूक कोंडीपासून सुटका करण्याच्या दृष्टीने ठाणे शहरातील कोपरी येथे २+२ पथ मगिकेच्या रेल्वे ओलंडणी पुलाचे ४+४ मार्गिका असे रुंदीकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे. कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाच्या कामाचा संपूर्ण खर्च एमएमआरडीएमार्फत करण्यात आला आहे. पुलाच्या रेल्वे मार्गिकांवरील भागाचे काम मध्य रेल्वे मार्फत करण्यात आले असून या भागाच्या बांधकामाकरीता प्राधिकरणकडून रेल्वेला निधी देण्यात आला आहे. या पुलाची लांबी ७४८ मीटर तर रुंदी ३७.०४ मीटर इतकी आहे.

या प्रकल्पात नौपाडा जंक्शन ते ज्ञानसाधना कॉलेज पर्यंत महामार्गा खालून वाहानांच्या रहदारीकरीता २+२ मार्गिकांचा ४० मीटर लांब आणि २१.१ मीटर रुंद भुयारी मार्ग देखील बांधण्यात आला आहे. प्रस्तावित नवीन कोपरी स्टेशनला जोडणारा वाहनांसाठी भुयारीमार्ग, पादचाऱ्यांना पूर्व द्रुतगती महामार्ग ओलांडण्या पादचारी पूल देखील बांधण्यात आला आहे. तसेच चिखलवाडी परिसरातील पावसाळी पाण्याचा निचरा होण्याकरीता, चिखलवाडी नाल्यापासून साठेवाडी नाल्यापर्यंत पर्जन्य जल वहिनीची (स्ट्रॉम वॉटर ड्रेनची) सुविधा उपलब्ध करून देणारा बंधिस्त नाल्याचे सुधारीकारण देखील करण्यात आले आहे.

"कोपरी पूल हा मुंबई आणि ठाणे या दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. जुना पूल हा अरुंद असल्यामुळे व्यस्त तासांत ( पीक अवर्स) मध्ये वाहनचालकांना काही मीटरचा प्रवास करण्यासाठी ३० ते ४० मिनिटे लागतात. पूर्व द्रुतगती महामार्गावरील दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी होत होती. नवीन रुंद पुलामुळे प्रवाशांचा आता हा वेळ वाचणार आहे. त्यासोबतच तीन हात नाका परिसरातील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात घट होणार आहे" असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त श्री एस. व्ही. आर. श्रीनिवास म्हणाले.

Web Title: Rescue of Thanekar from the dilemma on the Eastern Expressway, New Kopri bridge finally inaugurated by Chief Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.