बाशिंग बांधलेल्यांचा झाला हिरमोड, ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 01:11 AM2021-02-04T01:11:03+5:302021-02-04T01:11:30+5:30

Gram Panchayat News : काही महत्त्वाची गावे अनुसूचित जाती व जमातीसाठी राखीव झाल्याने सरपंचपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेकांचा मात्र हिरमोड झाला आहे.

the reservation for the post of Gram Panchayat Sarpanch was announced | बाशिंग बांधलेल्यांचा झाला हिरमोड, ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

बाशिंग बांधलेल्यांचा झाला हिरमोड, ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

Next

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. सरपंचपदासाठी बुधवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षण सोडतीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. काही महत्त्वाची गावे अनुसूचित जाती व जमातीसाठी राखीव झाल्याने सरपंचपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेकांचा मात्र हिरमोड झाला आहे.

तालुक्यातील १२१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत तहसीलदार अधिक पाटील यांनी जाहीर केली. या प्रसंगी निरीक्षक म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नाळदकर, पंचायत समिती सभापती ललिता पाटील, नायब तहसीलदार गोरख फडतरे, महेश चौधरी आदी उपस्थित होते.

अनुसूचित जाती महिला आरक्षणात कुरुंद, सावंदे, गोवे या ग्रामपंचायती जाहीर झाल्या. तर अनुसूचित जाती सर्वसाधारण आरक्षण शेलार, राहनाळ, गोरसई या ग्रामपंचायतींना जाहीर झाले आहे. अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी खांबाळा, कांदळी, डोहाळे, लाप (बु.) अनुसूचित जमाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी भादाणे, अंजूर, भिनार, कासणे या ग्रामपंचायतींना आरक्षण पडले असून इतर मागास प्रवर्ग महिलांसाठी वडघर, अनगाव, लामज, आवळे, कुसापूर, मालोडी, पिसे, चिराडपाडा, वांद्रे, तलवली, अर्जुनली, खानिवली, कवाड या ग्रामपंचायतींना जाहीर झाले आहे.

इतर मागास प्रवर्ग 
( सर्वसाधारणसाठी) निवळी, कोशिंबे, खालींग बु, बोरीवलीतर्फे राहुर, सापे, नांदकर, पुंडास, चावे, दिवे केवणी, किरवलीतर्फे सोनाळे, ब्राह्मण गाव, तर अनुसूचित क्षेत्रात ३९ ग्रामपंचायतींचा समावेश होत असून मैंदे, अकलोली, खरीवली, दाभाड, पाये, दुगाड, पिळंझे, कांबे, लाखीवली, घोटगाव, गाणे फिरिंग पाडा, वेढे, वारेट, चिंचवली, नांदिठणे, अंबाडी, शिरोळे, मोहिली, खडकी, केल्हे या २० ग्रामपंचायती अनुसूचित जमाती महिलांकरिता आरक्षित करण्यात आल्या आहेत. 
सुपेगाव, मोहंडूळ, वज्रेश्वरी,  झिडके, एकसाल, गणेशपुरी पारिवली, कुंदे, पालखणे, पाच्छापूर, चाणे, मालबिडी, कुहे, चिंबीपाडा, दूधनी, अस्नोलतर्फे दुगाड, पहारे, दिघाशी या अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींचे सरपंचपद हे अनुसूचित जमातीमधील सर्वसाधारण उमेदवारासाठी राखीव आहे. 

कल्याणमधील ४१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण झाले जाहीर  
टिटवाळा : कल्याण तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत बुधवारी कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात तहसीलदार दीपक आकडे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली. यावेळी नागरिकांच्या समक्ष चिठ्ठ्या टाकून आरक्षण काढण्यात आले.
तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींसाठी १५ रोजी निवडणूक झाली होती. १८ जानेवारीला मतमोजणी झाली. या गावांची तसेच सहा महिन्यांनंतर निवडणुका होणार असलेल्या २० गावांच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत यावेळी काढण्यात आली. या आरक्षण सोडतीत अनुसूचित जातीसाठी तीन, अनुसूचित जमातीसाठी तीन, नागरिकांचा मागास प्रवर्ग ११ जागा आणि महिलांसाठी एकूण जागांपैकी १२ जागा राखीव, अशा पद्धतीने आरक्षण काढल्याची माहिती आकडे यांनी दिली.
त्यानुसार अनुसूचित जाती, सर्वसाधारण : गोवेली-रेवती, अनुसूचित जाती (महिला) - (चिठ्ठी काढून) वरप, निंबवली मोस, अनुसूचित जमाती : चौरे, कांबा,
अनुसूचित जमाती (महिला) : म्हसकळ - आनखर. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : कुंदे, फळेगाव, आपटी-मांजर्ली, नडगाव-दानबाव, रायते-पिंपळोली. नागरिकांचा मागास प्रवर्ग : घोटसई, गेरसे, वेहळे, आणे-भिसोळ, राया-ओझर्ली, म्हारळ. 

सर्वसाधारण गटाचे आरक्षण 
सर्वसाधारण महिला : उतणे-चिंचवली, पोई, पळसोली, मानिवली, सांगोडे - कोंढेली, नवगाव बापसई, बेहरे, वासुंद्री, वडवली-शिरढोण, रोहन-अंतार्डे, उशिद-अरेळे, खोणी-वडवली, मानिवली. सर्वसाधारण : दहीवली अडवली, गुरवली, वसद-शेलवली, काकड पाडा, दहागाव, वाहोली, रुंदे-आंबिवली, नांदप, मामनोली, कोसले, केळणी-कोलम, जांभूळ-मोहिली. 

मुरबाड तालुक्यात कहीं खुशी कहीं गम   
 
मुरबाड : सरपंचपदासाठी बुधवारी आरक्षण सोडत मुरबाड औद्योगिक वसाहत सभागृहात तहसीलदार अमोल कदम यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. एकूण ४४ ग्रामपंचायतींसाठी ही सोडत काढण्यात आली. यावेळी एका लहान मुलीच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. दरम्यान, या सोडतीमुळे तालुक्यात कहीं खुशी कहीं गम असे चित्र निर्माण झाले आहे.
मुरबाड तालुक्यातील १२६  पैकी ४४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पाच ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या होत्या. तर ३९ ग्रामपंचायतीत निवडणुका पार पडल्या होत्या. यातही काही जागा बिनविरोध झाल्या होत्या. यातील शिवळे, खांडपे, उचले या तीन ठिकाणी अनुसूचित जातीचे आरक्षण पडले. तर मासले, आसोसे, खानिवरे या तीन ठिकाणी अनुसूचित जमाती तर नढई, मोहप, शेलारी, कोरावळे, माजगाव, कान्होळ, कान्हार्ले, जांभुर्डे, पाटगांव, कोलठण या दहा ठिकाणी इतर मागास महिला तर उर्वरित ग्रामपंचायत या सर्वसाधारण महिला व पुरुष यांच्याकरिता राहिलेल्या आहेत. आरक्षण सोडत ही ७१ ग्रामपंचायतींसाठी काढण्यात आली. अन्य २७ ग्रामपंचायत निवडणुकीची मुदत अद्याप संपलेली नाही.  

बिनविरोध सरपंच 
 सरपंच निवड थोड्याच दिवसात होणार असून त्यानंतर सरपंच कोणत्या पक्षाचा हे ठरेल. आजच्या आरक्षण सोडतीने इच्छुकांची निराशा झाली आहे. 
 खांडपे ग्रामपंचायतीत आरक्षण अनुसूचित जमातीचे पडले असून त्या ठिकाणी या प्रवर्गातून निवडून आलेल्या एकमेव सदस्या अक्षता वाकचौडे या बिनविरोध सरपंच होणार आहेत. त्यामुळे तेथील चित्र स्पष्ट 
झाले आहे. 

शहापूर तालुका : ५४ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव 
शहापूर : तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतींचे आरक्षण बुधवारी जिल्हा पुरवठा अधिकारी राजू थोटे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आले. तालुक्यातील ५४ ग्रामपंचायती या अनुसूचित जमातींच्या महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. यावेळी तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी, गटविकास अधिकारी अशोक भवार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, पंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे : आवळे, आवारे, अस्नोली, अजनुप, आटगाव, अल्याणी, बोरशेती, भातसई, बाभळे, चेरपोली, चिखलगाव, चोंढे, दहिगाव, ढाढरे, दळखण, दहिवली, ढाकणे, डोळखांब , फुगाळे, गेगाव, गोठेघर, जांभूळवाड, हिव, खुंटघर, कोठारे, खातिवली, किन्हवली, कानवे, लेनाड, मुगाव, मळेगाव, मोखावणे, माळ, नडगाव, रानविहीर, शेंद्रूण, शेणवा, सारंगपुरी, साठगाव, सरलांबे, शेलवली (बा), शीळ, सावरोली ( सो) साकुर्ली, शेरा, टेंभरे, ठुणे, टेंभा, टहारपूर, अंबरखांड , वासिंद, वालशेत, वांद्रे, वेहळोली(बु). 

सोगावकडे लक्ष
अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित झालेल्या ग्रामपंचायतीत सोगाव, कानडी, उंभ्रइ, मुसई, शेलवली (खं), धसई, आपटे, मांजरे, खर्डी, धामणी, वरस्कोळ, वाशाळा(बु), कोथळे, बिरवाडी, लाहे, खरीवलीस, वेहलोंढे ,पिवळी, दहागाव, सारमाळ, साने, शेई, मढ, आसनगाव, नडगाव, शिरगाव, कळगाव, सापगाव, नांदवळ, मानखिंड, खरीवली, सवरोली (बु), पाषाणे, वेहळोली (वा), गुंडे, शिरवंजे, साकडबाव , मोहिली, कळमगाव, अंबर्जे, विहिगाव, लवले, खराडे, मासवणे, वेलूक, तळवाडे, शिरोळ, भावसे यांचा समावेश आहे. 


 

Web Title: the reservation for the post of Gram Panchayat Sarpanch was announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.