भातसा धरणातून आरक्षित पाणी मिळावे; भिवंडी पालिकेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 11:07 PM2020-01-14T23:07:28+5:302020-01-14T23:07:41+5:30

वाढत्या लोकसंख्येनुसार अपुरा पुरवठा, प्रस्ताव सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला

Reserve water from the paddy dam; Demand for Bhiwandi Municipality | भातसा धरणातून आरक्षित पाणी मिळावे; भिवंडी पालिकेची मागणी

भातसा धरणातून आरक्षित पाणी मिळावे; भिवंडी पालिकेची मागणी

Next

वासिंद : भिवंडी महापालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या, नागरीकरण यामुळे अपुरी पाणी समस्या जाणवत असल्याने शहराला भातसा धरणातून आरक्षित पाणी मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात असलेले भातसा धरणाचे पाणी शेती सिंचन तसेच व इतर वापरासाठी उपयुक्त ठरत आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायती, कारखाने, वीजनिर्मिती प्रकल्प, भातशेती यांच्यासह ठाणे व मुंबई महापालिका यांच्या मागणीनुसार पाणी पुरवठा करण्यात येतो. या धरणाची ९७६.१० दशलक्ष घनमीटर पाणी क्षमता असून सध्या ७३५.०६८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे.
ठाणे, मुंबई महापालिका बरोबरच वाढत्या पाण्याच्या गरजेनुसार भिवंडी महापालिकेनेही शहराला १०० दशलक्ष लिटर पाणी मिळावे अशी मागणी केली असून हा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला असल्याचे भातसा कालवा विभागाकडून सांगण्यात आले.

भातसा नदीजवळ असलेल्या शहापूर, कल्याण व इतर तालुक्यातील ३८ ग्रामपंचायती, जे.एस.डब्ल्यू, व लिबर्टी कंपनी तसेच भातसाधरण, सरलांबे, खुटघर, कासगांव येथील वीजनिर्मिती प्रकल्प केंद्र यांना पाणी दिले जाते. त्याचबरोबर ठाणे, मुंबई महापालिकेच्या मागणीनुसार पाणी पुरवठा केला जात असून सध्या ठाणे २०० दशलक्ष लिटर तर मुंबई १८५० दशलक्ष लिटर रोजची मागणी आहे. हंगाम लागवडीसाठी सध्या उजव्या तीर (कालव्याद्वारे) १७५ क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. भातसा धरणातील पाणी भातसा उजवा कालवाद्वारे हंगाम भातशेतीसाठी तर भातसा नदीतून पिसे बंधाऱ्यापर्यंत पोहचवून त्यानंतर ठाणे-मुंबई शहराला पुरवठा तसेच नदीतून इतरांना वापरासाठी उचलले जाते.

Web Title: Reserve water from the paddy dam; Demand for Bhiwandi Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण