उल्हासनगर महापालिकेत विविध विभाग खात्याचा खांदेपालट
By सदानंद नाईक | Updated: April 9, 2025 19:46 IST2025-04-09T19:46:11+5:302025-04-09T19:46:11+5:30
चार उपायुक्त व चार सहायक आयुक्तवर जबाबदारी

उल्हासनगर महापालिकेत विविध विभाग खात्याचा खांदेपालट
सदानंद नाईक, उल्हासनगर : महापालिका कारभारात पारदर्शकता, नियमितता व काम जलद होण्यासाठी आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी विविध विभागाच्या खात्याचे वाटप चार उपायुक्त व चार सहायक आयुक्त यामध्ये केले. खाते वाटपामुळे काम जलद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
उल्हासनगर महापालिकेला शासनाने प्रतिनियुक्तीवर ऐक अतिरिक्त आयुक्त, चार उपायुक्त व चार सहायक आयुक्त आदिची नियुक्ती केली. या अधिकाऱ्यामुळे महापालिका कामकाज पारदर्शक व जलद होण्याची आशा आहे. आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी उपायुक्त व सहायक आयुक्त यांना प्रशासकीय कामकाजाची विभागणी केली. लिपिक वर्गाच्या कर्मचाऱ्याकडे वर्ग-१ व २ च्या पदासह महत्वाच्या विभागाचा पदभार यापूर्वी दिला होता. अश्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पदावर पाठविले. आजही अनेक कर्मचाऱ्याकडे महत्वाचे विभाग कायम आहे.
उपायुक्त विशाखा मोटघरे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, मालमत्ता कर, उद्यान, वृक्ष प्राधिकरण, मालमत्ता, सार्वजनिक आरोग्य व माहिती व तंत्रज्ञान हे विभाग सोपविले आहे. उपायुक्त डॉ दीपाली चौगले यांच्याकडे सामान्य प्रशासन, अभिलेख, विधी, आपत्ती व्यवस्थापन, सुरक्षा, अग्निशमन व भांडार विभाग आदी विभागाचा पदभार दिला.
उपायुक्त अनंत जवादवार यांच्याकडे पाणीपुरवठा, दिव्यांग, महिला व बालकल्याण, राष्ट्रीय आपत्ती आदी विभाग आहे. उपायुक्त डॉ विजय खेडकर यांच्याकडे वैधकीय आरोग्य, वाहन व परिवहन विभाग, आधार केंद्र, जनगणना, पर्यावरण, बाजार परवाना, क्रीडा व सांस्कृतिक आदी विभागाचा पदभार सोपविला आहे.
उपयुक्ताकडे सोपाविण्यात आलेले विभागाचा पतीपदभार अजय साबळे, राहुल लोंढे, मयुरी कदम व विशाल कदम यांच्याकडे सोपवीला आहे. तर अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्याकडे नगररचनाकार, अनधिकृत बांधकामे निष्काशीत करणे व महापालिका सचिव आदी पदाचा पदभार दिला. तर आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी स्वतःच्या नियंत्रणाखाली थेट लेखा व लेखा परीक्षण विभाग ठेवला आहे.