उल्हासनगरवासीयांनी अभय योजनेचा लाभ घ्या, महापालिका आयुक्तांचे आवाहन
By सदानंद नाईक | Published: February 26, 2024 07:36 PM2024-02-26T19:36:08+5:302024-02-26T19:36:17+5:30
उल्हासनगर : महापालिकेने २६ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान मालमत्ता कर व पाणीपट्टी कर थकबाकीधारकासाठी अभय योजना जाहीर केली. ...
उल्हासनगर: महापालिकेने २६ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान मालमत्ता कर व पाणीपट्टी कर थकबाकीधारकासाठी अभय योजना जाहीर केली. बिलावरील १०० टक्के विलंब शुल्क माफ केले जाणार असून शहरवासीयांनी लाभ घेण्याचे आवाहन आयुक्त अजीज शेख यांनी केले आहे.
उल्हासनगर महापालिका मालमत्ता व पाणीपट्टी कर थकबाकीदारासाठी आयुक्त अजीज शेख यांनी २६ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान अभय योजना सुरू केली. लोकसभा निवडणुकीपूर्वी महापालिकेने शहरवासीयांना एक चांगली संधी उपलब्ध करून दिल्याचे बोलले जात आहे. एका आठवड्यासाठी अभय योजना लागू करावी, जेणे करुण नागरिकांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळेल. अशी मागणी राजकीय नेत्यांकडून महापालिका आयुक्त अजीज शेख यांना झाली होती.
अखेर आयुक्त अजीज शेख यांनी अभय सुरू करून २६ फेब्रुवारीच्या पाहिल्या दिवसी नागरिकांकडून अभय योजनेला मिळावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र ३० ते ४० कोटी अभय योजने अंतर्गत मालमत्ता व पाणीपट्टी कर वसूल होण्याचे संकेत आयुक्त अजीज शेख यांनी दिले. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. गेल्या ११ महिन्यात मालमत्ता कर विभागाची फक्त ७० कोटी वसुली झाली असून महापालिकेचे १२० कोटीचे वसुली टार्गेट असल्याचे बोलले जात आहे.