भाईंदरमधील ‘हर्बल’ हुक्का पार्लरला रहिवाशांचा विरोध; न्यायालयाने दिले कारवाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 12:10 AM2019-11-01T00:10:11+5:302019-11-01T00:10:28+5:30

कारवाईबाबत पोलिसांनी ठेवले कानावर हात

Residents protest 'herbal' hookah parlor in Bhayandar; Order of court action | भाईंदरमधील ‘हर्बल’ हुक्का पार्लरला रहिवाशांचा विरोध; न्यायालयाने दिले कारवाईचे आदेश

भाईंदरमधील ‘हर्बल’ हुक्का पार्लरला रहिवाशांचा विरोध; न्यायालयाने दिले कारवाईचे आदेश

Next

मीरा रोड : भाईंदरच्या डोंगरी पोलीस चौकी जवळ असलेल्या हुक्का पार्लरमध्ये तरुण, तरुणींच्या वाढत्या गर्दीमुळे या परिसरातील नागरीकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. उच्च न्यायालयाने हर्बल हुक्क्याच्या सेवनास परवानगी दिल्याने कारवाई करता येत नसल्याचे पोलिसांचे म्हटले आहे. मात्र, न्यायालयाच्या आदेशाचा सोयीने वापर करुन हुक्का पार्लरला पाठीशी घातले जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला.

भाईंदरच्या उत्तन सागरी पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत असलेल्या डोंगरी चेक पोस्ट जवळ हुक्का पार्लर तसेच बार सुरु आहे. या ठिकाणी मध्यरात्रीनंतर हुक्का पार्लर चालवला जातोे. उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक एस.डी.निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर हुक्का पार्लर चालकाने मुंबईतील अन्य हुक्का पार्लर चालकांसोबत मिळून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आपण हर्बल हुक्का पुरवत असल्याचा दावा केल्याने न्यायालयाकडून परवानगी मिळवली आहे.

पोलीस नियमित जाऊन तपासणी करीत असल्याचे निकम यांनी सांगितले. ४ सप्टेंबर रोजी सदर हुक्का पार्लरवर केलेल्या कारवाईत सॅवियो मॉशीनो फनसेका (३६), रविकुमार अशोककुमार दुबे (२५) व आशिष रामआचल शर्मा (१९) या तिघांविरोधात गुन्हा दाखल केल्याचे ते म्हणाले. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक देवीदास हंडोरे यांनी देखील हर्बल हुक्का पार्लर असल्याने कारवाई शक्य नसल्याचे सांगितले.सत्यकाम फाऊंडेशनचे कृष्णा गुप्ता यांनी मात्र स्थानिक पोलीस आणि महापालिका यांच्या आशीर्वादाने तरुण पिढीला उदध्वस्त करणारे हे हुक्का पार्लर सुरु असल्याचा आरोप केला. हुक्का पार्लरचे बेकायदा बांधकाम महापालिका तोडत नसल्याचा आरोप गुप्ता यांनी केला.

Web Title: Residents protest 'herbal' hookah parlor in Bhayandar; Order of court action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.