शंभुराज देसाईंचे खासदार संजय राऊतांना चॅलेंज; राजीनामा देऊन पुन्हा निवडून या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 03:35 PM2023-02-08T15:35:11+5:302023-02-08T16:11:15+5:30
'आम्ही उद्धव ठाकरे यांचा कुठलाही आदेश मोडला नाही, म्हणूनच संजय राऊत खासदार झाले, ते आम्हाला गद्दार म्हणत आहेत.'
ठाणे (अजित मांडके )- आम्ही उद्धव ठाकरे यांचा कुठलाही आदेश मोडला नाही, म्हणूनच संजय राऊत खासदार झाले, ते आम्हाला गद्दार म्हणत आहेत. ते आमच्या मतावर निवडून आलेत, आता त्यांनी राजीनामा द्यावा आणि परत राज्यसभेत निवडून दाखवावे असं चॅलेज शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना दिले आहे.
'आम्ही नियमाचं घटनेचं निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीचं ह्या सगळ्या गोष्टीचं पालन करून कायद्याच्या नियमाच्या चौकटीत राहून आम्ही ही भूमिका घेतलेली आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, 'माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाच्या घटनेमध्ये ज्या तरतूद आहेत, त्याच्यावरती आमचा विश्वास आहे, त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल असा आम्हाला विश्वास आहे, असंही शंभुराज देसाई म्हणाले.
आमदार, खासदार आमच्याकडे जास्त असल्यामुळे पक्ष बळकवता येत नाही . आम्ही आमचा दावा निवडणूक कायद्यानं निवडणूक आयोगाला अधिकार दिलेले आहेत. त्यांच्या अधिकारात राहून त्यांनी जो निर्णय दिला तो आम्ही स्वीकारलेला आहे .पुढं ते जो निर्णय देणार आहेत तोही आम्ही स्वीकारणार आहे. दोन्ही बाजूंनी पक्षकांनी एकदा न्यायालयात गेल्यानंतर ते न्याय देवतेवर विश्वास ठेवून दोन्ही पक्षकांरानी तो निर्णय स्वीकारायचा असतो तसा आम्ही तयारी दर्शविलेली त्यांनी देखील तयारी दर्शवावी, असंही शंभुराज देसाई म्हणाले.
निकाल लागेल तो आमच्या बाजूने लागेल
'शिवसेनेमध्ये लोकप्रतिनिधींच बहुमत हे माननीय शिंदे साहेबांचे नेतृत्वाखाली आहे, 55 पैकी 40 आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत. 18 पैकी 13 खासदारही मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर आहेत. निवडून आलेले नगरसेवकही आमच्या बाजून आहेत', असंही शंभुराज देसाई म्हणाले.
'बहुतांश जिल्हाप्रमुख मुख्यमंत्री शिंदे यांच्या बरोबर आहेत. बहुमत आमच्याबरोबर आहे. आम्ही शिवसेना सोडलेली नाही, ज्या शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाबरोबर नैसर्गिक युती करून 2019 च्या निवडणुका लढवल्या. निवडणूक लढवताना पंतप्रधान मोदी यांचे स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावून मागून निवडून आलेले आम्ही इथे बसलेले आमदार आहोत. त्यामुळे लोकांचे मॅडेड आमच्या बाजूने होतं, त्याच्या उलट जे घडलं मागच्या अडीच वर्षात ते उलट लोकशाहीला धरून नव्हतं. म्हणून ते मूळ पदावर आणायचं काम मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केले, असंही शंभुराज देसाई म्हणाले.