सैन्य भरतीपूर्व मार्गदर्शन वेबिनाराला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:38 AM2021-05-16T04:38:59+5:302021-05-16T04:38:59+5:30
ठाणे : रोटरी क्लब ऑफ ठाणे व आगरी समाज मंडळ, ठाणे परिसर यांच्यातर्फे नुकताच मोफत सैन्य भरतीपूर्व मार्गदर्शन वेबिनार ...
ठाणे : रोटरी क्लब ऑफ ठाणे व आगरी समाज मंडळ, ठाणे परिसर यांच्यातर्फे नुकताच मोफत सैन्य भरतीपूर्व मार्गदर्शन वेबिनार घेण्यात आला. झूम, फेसबुक लाइव्हद्वारे झालेल्या या वेबिनारला दहावी, बारावी व पदवीधर तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
या वेबिनारमध्ये निवृत्त मेजर सुभाष गावंड यांनी मार्गदर्शन केले. इयत्ता दहावी, बारावी पास झाल्यानंतर, तसेच जवान पदावर सैन्यात भरती कसे व्हावे, त्याची प्रक्रिया आदींबाबत माहिती दिली, तर कमांडर पटनायक यांनी पदवीधरांनी अधिकारीपदांवर कसे भरती व्हावे, त्यासाठीची प्रवेश परीक्षा, तोंडी परीक्षा आदींबाबत मार्गदर्शन केले. उमेदवारांच्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली.
रोटरीचे अध्यक्ष डॉ. उल्हास वैद्य, तसेच आगरी समाज मंडळाचे अध्यक्ष विजय गावंड यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर रोटरी ठाणे जिल्हा (३१४२) चे गव्हर्नर डॉ. संदीप कदम यांनी या वेबिनारबद्दल माहिती दिली. वेबिनारचे सूत्रसंचलन नूतन डाकी यांनी केले.
--------------