बेमुदत संपासाठी पीडब्ल्यूडी, काेषागार कार्यालयाच्या द्वारसभांना कर्मचाऱ्यांच्या प्रतिसाद

By सुरेश लोखंडे | Published: December 11, 2023 09:15 PM2023-12-11T21:15:26+5:302023-12-11T21:17:05+5:30

कर्मचाऱ्यांनी उत्तम प्रतिसाद देऊन शासनाविराेधात रस्त्यावर उतरण्ण्याची तयारी दर्शवल्याचे कर्मचारी नेते भास्कर गव्हाळे यांनी लाेकमतला सांगितले.

responses of employees to pwd treasury office meetings for indefinite strike | बेमुदत संपासाठी पीडब्ल्यूडी, काेषागार कार्यालयाच्या द्वारसभांना कर्मचाऱ्यांच्या प्रतिसाद

बेमुदत संपासाठी पीडब्ल्यूडी, काेषागार कार्यालयाच्या द्वारसभांना कर्मचाऱ्यांच्या प्रतिसाद

सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी एकत्र राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली १४ डिसेंबरपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. त्यास अनुसरून साेमवारी या समन्वय समितीच्या नेत्यांनी सार्वजनिक बालकाम विभाग, काेषागर कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर  कर्मचाऱ्यांच्या व्दारसभा घेतल्या. त्यास कर्मचाऱ्यांनी उत्तम प्रतिसाद देऊन शासनाविराेधात रस्त्यावर उतरण्ण्याची तयारी दर्शवल्याचे कर्मचारी नेते भास्कर गव्हाळे यांनी लाेकमतला सांगितले.

बेमुदत संपाचा निर्धार करून कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरण्यासाठी मार्गदर्शनपर व्दारसभा घेण्यात येत आहे. त्यासाठी या बेमुदत संपाच्या समन्वय समितीचे नेते जिल्ह्यात सक्रीय झाले आहे. त्यातून आज पीडब्ल्यूडी व काेषागर कार्यालयाबाहेर सभा घेण्यात आली. तर मंगळवारी जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या प्रवेशव्दारावर ही सभा घेऊनद कर्मचाऱ्यांना बेमुदत संपाचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. राज्य शासनाने आश्वासन देऊनही मागण्या पूर्ण केल्या नसल्याचा आराेप या कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे संतापलेल्या या कर्मचाऱ्यांनी ऐन हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीतच बेमुदत संपाचे हत्यार उपसून प्रशासनाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू केलेा आहे. या बेमुदत संपाव्दारे जुन्या पेशन्सच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्या प्राधान्याने करण्यात येत आहे.

Web Title: responses of employees to pwd treasury office meetings for indefinite strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे