स्वच्छ शहराची जबाबदारी सर्वांचीच, महापौरांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 12:42 AM2019-11-30T00:42:18+5:302019-11-30T00:42:53+5:30

ठाणे शहरात स्वच्छता अभियान व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्याची जबाबदारी केवळ सफाई कामगारांची नसून ती प्रत्येक नागरिकाची आहे.

The responsibility of a clean city is the responsibility of all, the mayor | स्वच्छ शहराची जबाबदारी सर्वांचीच, महापौरांचे मत

स्वच्छ शहराची जबाबदारी सर्वांचीच, महापौरांचे मत

googlenewsNext

ठाणे : ठाणे शहरात स्वच्छता अभियान व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्याची जबाबदारी केवळ सफाई कामगारांची नसून ती प्रत्येक नागरिकाची आहे. स्वच्छता ही नैतिक जबाबदारी मानून काम केल्यास निश्चितच शहराचा कायापालट होईल, असे प्रतिपादन महापौर नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी केले.

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण २०२० या मोहिमेंतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याकरिता तयार केलेल्या रॅप गीताच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ठाणे शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची शपथ घेतली.

यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, भाजप गटनेते नारायण पवार, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर, उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी, प्रसिद्ध अभिनेते मंगेश देसाई, प्रसिद्ध संगीतकार चिनार-महेश, आरोग्य अधिकारी बालाजी हळदेकर, सहायक आयुक्त शंकर पाटोळे आदी उपस्थित होते. ठाणे शहराची यशोगाथा सांगणाºया ठाणे गौरव या गीताचे गीतकार उपायुक्त संदीप माळवी यांनी ठाणे आपले चमकू दे, हे गीत लिहिले आहे. टाइमपास, टाइमपास २, शर्यत, अशा चित्रपटांचे संगीतकार चिनार-महेश या आघाडीच्या जोडीने या गीताला संगीत दिले आहे.

सध्या तरु णांमध्ये रॅप गीताला प्रथम पसंती असून स्वच्छतेबाबतच ठाणे आपले चमकू दे हे गीत सर्वांना आवडेल असेच आहे. शहरातील चित्रपटगृहे, मॉल्स, सार्वजनिक महत्त्वाची ठिकाणी, घंटागाडी येथे हे गीत वाजविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

ठाणे होणार प्लास्टिकमुक्त

शहराला स्वच्छ ठेवण्याचे आवाहन आपले सर्वांचे आहे ते आपण सर्वांनी समर्थपणे पेलले पाहिजे. सफाई कर्मचाऱ्यांपेक्षा शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही आपली आहे, असेही त्यांनी सांगितले.

स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत शहरात परिसर स्वच्छता, ओला-सुका कचरा वर्गीकरण, प्लास्टिकबंदी, हगणदारीमुक्त शहर असे विविध उपक्र म राबविण्यात येत असून याबाबत नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.

रॅप गीतासोबतच शहरात प्लास्टिक वापर टाळा, स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे आदी संदेश देणारे फलक लावण्यात आले आहेत. नागरिकांनी एकदाच वापर करून फेकून देणाºया प्लास्टिकचा वापर बंद करावा. ठाणे शहर प्लास्टिक मुक्त करावे. कापडी पिशव्यांचा वापर करावा. स्वच्छता हे दैनंदिन कामापुरती मर्यादित न ठेवता स्वच्छतेची चळवळ ही मोठ्या प्रमाणात नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे, याकरिता ठाणे महापालिकेच्या वतीने व्यापक प्रमाणात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.

Web Title: The responsibility of a clean city is the responsibility of all, the mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.