झोपड्यांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी एसआरएवर; पालिकेला अपयश आल्याने घेतला निर्णय, बायोमेट्रीक पद्धतीने होणार नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 04:38 AM2017-11-12T04:38:18+5:302017-11-12T04:38:28+5:30

ठाणे महापालिका हद्दीतील झोपडपट्ट्यांच्या बायोमेट्रीक सर्वेक्षणाचा पालिकेचा प्रयत्न फसला असताना आता नव्याने एसआरएच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मुंबईतील सर्वेक्षणाच्या धर्तीवर प्रत्यक्ष घरोघरी जाऊन ही सर्वेक्षण प्रक्रि या करण्याचे एसआरएने निश्चित केले आहे.

The responsibility of survey of huts on SRE; Decision taken by the corporation for failing, enrollment in biometric mode | झोपड्यांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी एसआरएवर; पालिकेला अपयश आल्याने घेतला निर्णय, बायोमेट्रीक पद्धतीने होणार नोंदणी

झोपड्यांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी एसआरएवर; पालिकेला अपयश आल्याने घेतला निर्णय, बायोमेट्रीक पद्धतीने होणार नोंदणी

Next

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीतील झोपडपट्ट्यांच्या बायोमेट्रीक सर्वेक्षणाचा पालिकेचा प्रयत्न फसला असताना आता नव्याने एसआरएच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मुंबईतील सर्वेक्षणाच्या धर्तीवर प्रत्यक्ष घरोघरी जाऊन ही सर्वेक्षण प्रक्रि या करण्याचे एसआरएने निश्चित केले आहे. त्यानुसार, येत्या १ डिसेंबरपासून ते सुरू होणार असून या प्रक्रि येत संपूर्ण पारदर्शकता बाळगून प्रत्यक्ष लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळवून देणार असल्याचा दावा महामंडळाने केला आहे.
ठाणे शहराला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी नागपूर आणि पुणे शहरांच्या धर्तीवर २०१५ मध्ये एसआरए योजना ठाण्यामध्ये आणण्यात आली. या योजनेंतर्गत ठाण्यात ९४ प्रकल्प राबवण्याचे निश्चित करण्यात आले. परंतु, त्यासाठी अचूक माहिती घेणे आवश्यक होते. यासाठीच आता महामंडळाने मुंबईसारखेच ठाण्यातही घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईमध्ये दीड वर्षापूर्वी हे सर्वेक्षण सुरू झाले आहे. त्याच पद्धतीने हे हायटेक सर्वेक्षण ठाण्यामध्ये १ डिसेंबरपासून सुरू होणार असून ते सहा महिन्यांत पूर्ण होणार आहे. लीडर (लाइट डिटेक्शन अ‍ॅण्ड रेजिंग मशीन) ही हायटेक प्रणाली वापरून हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यामध्ये, प्रत्येक झोपडीचे छायाचित्र ३६० अंशांनी काढता येणार असून शहराच्या नकाशावर ते समाविष्ट करता येणार आहे. एसआरएचे सदस्य प्रत्येक झोपडीत प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणचे छायाचित्रण करतील. कुटुंबप्रमुखाचे नाव, सदस्यांची माहिती आणि आधार किंवा पॅनकार्डसारखे दाखले नोंद करतील. त्यानंतर, ही सर्व माहिती समाविष्ट करून घेण्यात येणार आहे. झोपडीचे मोजमाप करून आसपासच्या परिसराचेसुद्धा चित्रीकरण करण्यात येणार असल्याची माहिती एसआरएच्या अधिकाºयांनी दिली.
हे सर्वेक्षण करण्यासाठी तीन संस्थांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक झोपडीचे योग्य मोजमाप करून त्या जागेच्या सीमारेषा ठरवण्यात येतील आणि ही सर्व माहिती नोंदणीकृत करण्यात येणार आहे. ज्यामुळे प्रत्येकाला या योजनेचा लाभ घेता येईल. या उच्च तंत्रज्ञ पद्धतीमुळे कोणत्याही वादाचे कारण शिल्लक राहणार नसल्याचा दावाही करण्यात येत आहे.
आजवर सर्वेक्षण हे फक्त लोकसंख्येच्या धर्तीवर अवलंबून होते. मात्र, आता प्रत्यक्षात दारोदारी जाऊन सर्वेक्षण केल्यामुळे त्याला ठोस मजबुती असेल, असा दावा महामंडळाने केला आहे. बीएसयूपी योजनेसाठी महापालिकेने बायोमेट्रीक सर्वेक्षणाची सुरु वात केली होती. मात्र, या प्रक्रि येत अनेक अनियमितता आढळल्याने हे सर्वेक्षण रद्द ठरवण्यात आले. ठाण्यात एसआरएअंतर्गत ९४ प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यापैकी सद्य:स्थितीत २७ प्रकल्प हे अद्याप प्राथमिक अवस्थेत आहेत, तर ६७ प्रकल्पांवर काम सुरू आहे. या ६७ प्रकल्पांपैकी ३५ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. याच ३५ प्रकल्पांमध्ये एसआरडीअंतर्गत करण्यात आलेल्या १७ प्रकल्पांचासुद्धा समावेश आहे. हे १७ प्रकल्पसुद्धा कालांतराने एसआरए प्रकल्पात वर्ग करण्यात आले होते. ठाण्यात १५,००० कुटुंबांना अद्यापपर्यंत या प्रकल्पाचा लाभ झालेला आहे. पूर्ण झालेले ३५ प्रकल्प हे शहरातील मध्यवर्ती भागातील आहेत.

सर्वेक्षणाचे हे आहेत फायदे
झोपडपट्टीचे संपूर्ण संकलन एकाच ठिकाणी, एसआरए योजना लाभार्थ्यांची ओळख, पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराला आळा, अनेक ठिकाणी असणाºया वादांमुळे रखडलेले प्रकल्प मार्गी लागतील, सर्व झोपड्यांचे नकाशे तयार होतील आणि अनधिकृत झोपड्यांचे बिंग सहज फुटेल, असे काही फायदे आहेत.
ठाण्यातील १८ लाख लोकसंख्येतील तब्बल ५४ टक्के लोक हे झोपडपट्टीत राहतात. शहरात २२७ झोपडपट्ट्या असून तब्बल २.३२ लाख घरे आहेत. तर, ९ लाख लोक त्या ठिकाणी वास्तव्य करत आहेत. बीएसयूपी आणि एसआरडीअंतर्गत महापालिकेने काही घरे बांधली, मात्र अद्यापही २ लाख घरांची मागणी कायम आहे.

नौपाडा, पाचपाखाडी, कोपरी यासारख्या परिसरात हे प्रकल्प लवकर पूर्ण झाले. कळवा, मुंब्रा, घोडबंदर यासारख्या कमी दर असणाºया परिसराकडे विकासक आकृष्ट होत नसल्याने या ठिकाणचे प्रकल्प वेळेवर पूर्ण होऊ शकत नसल्याचा दावा महामंडळ करत आहे. ठाणे शहरातील घरांना पुनर्विक्रीसाठी मागणी आहे.

Web Title: The responsibility of survey of huts on SRE; Decision taken by the corporation for failing, enrollment in biometric mode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे