जिल्हाधिकाऱ्यांकडून संचारबंदीचे निर्बंध शिथील; व्यापाऱ्यांमध्ये समाधान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 05:53 PM2021-06-06T17:53:53+5:302021-06-06T17:54:18+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाच्या आदेशान्वये त्यांच्या नियंत्रणातील क्षेत्रतील सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने सायंकाळी 4 वाजेर्पयत सुरू ठेवण्याच्या आदेशासह याच कालावधीत इतर वस्तूंचा व्यवहार करणाऱ्या आस्थापना सोमवार ते शुक्र वारपर्यंत सुरू ठेवण्यास सहमती दिली आहे.
ठाणे : जिल्ह्यातील कोरोना रूग्ण संख्या वाढीचा व उपाचार्थी रूग्णांचा दर लक्षात घेऊन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी लागू असलेल्या संचारबंदीचे निर्बंध नव्याने काही अंशी शिथील केल्याचे आदेश सोमवारपासून जारी केले आहेत. त्यामध्ये सोमवार ते शुक्रवार या कालावधीत दुकानांना सायंकाळी 4 वाजेर्पयत सुरू ठेवण्याच्या परवानगीसह परिवहन सेवा 100 टक्के प्रवासी क्षमतेने सुरू ठेवणे, लग्न समारंभासाठी 50 जणांची उपस्थिती, अंत्यविधीला 20 जणं, मॉल, सिनेमागृह मात्र बंदच असणार आहेत. तर, शनिवार, रविवार या सुटीच्या दिवसी मात्र आत्ताचे निर्बंध लागू ठेवले आहेत.
केंद्र व राज्य शासनाने नागरिकांची गर्दी होऊ नये आणि परस्पर संपर्क वाढून विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी संपूर्ण राज्यभरात वेळोवेळी संचार बंदी घोषीत करून मार्गदर्शक सूचना, आदेश जारी केले आहेत. मात्र शासनाच्या नवीन आदेशास अनुसरून या र्निबधांना पुन्हा शिथील करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी मिरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर महानगरपालिकां, अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर नगरपरिषद, शहापूर, मुरबाड नगर पंचायत क्षेत्र व संपूर्ण ग्रामीण भागात लागू केले आहेत. यासाठी जारी केलेले आदेश 7 जून रोजी सकाळी 7 वाजेपासून 13 जून रोजी मध्यरात्री 12 वाजेर्पयत लागू केलेले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाच्या आदेशान्वये त्यांच्या नियंत्रणातील क्षेत्रतील सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने सायंकाळी 4 वाजेर्पयत सुरू ठेवण्याच्या आदेशासह याच कालावधीत इतर वस्तूंचा व्यवहार करणाऱ्या आस्थापना सोमवार ते शुक्र वारपर्यंत सुरू ठेवण्यास सहमती दिली आहे. तर मॉल व सिनेमागृह,नाटय़गृह बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहे. रेस्टॉरंटस सोमवार ते शुक्र वार 50 टक्के बैठक क्षमतेने सायंकाळी 4 वाजेर्पयत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. यानंतर मात्र शनिवारी आणि रविवारी फक्त टेक अवे, पार्सल सर्विसेस आणि होम डिलेव्हरी सेवा देता येणार आहे.
उपनगरीय लोकल वाहतुकीबाबत बृहन्ममुंबई महानगरपालिकेने निर्गमित केलेले आदेश लागू ठेवलेले आहेत. सार्वजनिक ठिकाणो, खुली मैदाने, चालणे, सायकलींग दररोज सकाळी 5 वाजेपासून सकाळी 9 वाजेर्पयत सुरू ठेवता येतील. खासगी कार्यालयांना कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सायंकाळी 4 वाजेपर्यंत सूट देण्यात आलेली आहे. कार्यालयीन उपस्थिती शासकीय कार्यालयांसह खाजगी कार्यालयांना 50 टक्के क्षमतेने सुरू राहील. चित्रीकरण सायंकाळी 4 वाजेर्पयत ठेवता येईल. यानंतर मात्र कोणत्याही हालचाली सुरू ठेवण्यात मनाई करण्यात आली आहे.
सामाजिक मेळावे, सांस्कृतिक, करमणूक कार्यक्रम 50 टक्के क्षमतेने सोमवार ते शुक्रवार सायंकाळर्पयत ठेवण्यास परवानगी आहे. लग्न समारंभ फक्त 5क् लोकांच्या उपस्थितील करता येईल. अंत्यसंस्कार विधी फक्त 20 लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडेल. बैठका, सहकारी संस्थांच्या निवडणूका सभागृहाच्या 50 टक्के बैठक क्षमतेने घेता येतील. बांधकामे केवळ ऑनसाईट मजूर राहणाऱ्या ठिकाणी किंवा सायंकाळी 4 वाजेपर्यंत कामगारांनी कामाचे ठिकाण सोडले पाहिजे, या अटीवर परवानगी आहे. कृषि सेवा दुकाने परवानगी दिलेल्या वेळेत सुरू राहणार आहेत.
ई-कॉमर्स साहित्य व सेवा पूर्वीप्रमाणो नियमीत सुरू ठेवता येतील. जमावबंदी सायंकाळी 5 वाजेर्पयत व संचारबंदी सायंकाळी 5 वाजेपासून लागू राहणार आहे. व्यायामशाळा, केश कर्तनालय, ब्यूटी सेंटर्स, स्पा, वेलनेस सेंटर्स सायंकाळर्पयत अध्र्या क्षमतेने सुरू ठेवता येतील. सार्वजनीक परिवहन सेवा 100 टक्के बैठक क्षमतेने सुरू ठेवता येणार आहे. मात्र, प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्यास मनाई आहे. मालवाहतूक जास्तीत जास्त तीन व्यक्तींसह करता येईल. खासगी कार, टॅक्सी, बस लांब पल्ल्याच्या गाड्याद्वारे होणाऱ्या प्रवासासाठी परवानगी घ्यावी लागेल. उत्पादन निर्यातीचे बंधन पूर्ण करण्याची आवश्यकता असलेल्या एमएसएमईसह निर्यात करणारे यूनिट नियमीतपणो राहील. उत्पादन सेक्टरमधील यूनिट केवळ 50 टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी आहे.
ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकां क्षेत्रामध्ये संबंधित महानगरपालिका आयुक्त तथा इन्सीहन्ट कमांडर यांनी पारीत केलेले आदेश त्या-त्या महापालिका क्षेत्रमध्ये आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली लागू राहतील. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीताचे विरुद कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.