राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल अपुरा व अन्यायकारक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 04:53 PM2018-01-16T16:53:48+5:302018-01-16T16:54:09+5:30
राज्य नाट्यस्पर्धा नुकतीच डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात नुकतीच पार पडली. या नाट्य स्पर्धेचा निकाल अपुरा व अन्यायकारक असल्याचे मत नाट्यक्षेत्रांशी संबधित असलेल्यांकडून व्यक्त करण्यात आले आहे.
डोंबिवली - राज्य नाट्यस्पर्धा नुकतीच डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात नुकतीच पार पडली. या नाट्य स्पर्धेचा निकाल अपुरा व अन्यायकारक असल्याचे मत नाट्यक्षेत्रांशी संबधित असलेल्यांकडून व्यक्त करण्यात आले आहे.
या राज्य नाट्यस्पर्धेला भरभरुन प्रतिसाद मिळाला. त्यात २४ नाट्यसंस्थांनी त्यांचे प्रयोग सादर केले. पारितोषिकासाठी केवळ तीनच संस्था निवडल्या गेल्या. सर्वसाधारणपणे पाच नाटकातून एका नाटकाला पारितोषिकासाठी निवडले गेले पाहिजे होते. सांस्कृतिक संचालनालय १२ ते १५ नाटकातून तीन नाट्य पारितोषिके काढते. या स्पर्धेत २४ नाट्य संस्थांनी त्यांचे दर्जेदार प्रयोग सादर केले होते. त्यामुळे २४ नाट्यसंस्थांचा आकडा पाहता किमान ५ पारितोषिके काढली पाहिजे होती. यातून सहभागी झालेल्या नाट्यसंस्थांवर अन्याय झाला असल्याचे मत नाट्य स्पर्धेतील सगळी नाटके पाहणारे लेखक व अभिनेता सु. श्री. इनामदार यांनी व्यक्त केले आहे. पारितोषिक निवडीसाठी नाटकांच्या संख्येत बदल झाला पाहिजे. पारितोषिके मिळालेल्या नाटका व्यतिरिक्त रूठी रानी का महल,कॅलिग्युला, केस नंबर ९९, बघ आपल्यालाही असेच नाचायला हवे आणि शेवटचा पर्याय ही नाटके दर्जेदार होती. त्यांचे प्रयोगही चांगले झाले. ‘बघ आपल्यालाही असे नाचायला हवे’ या नाटकातील स्त्री भुमिका सर्वोत्कृष्ट असून तिला देखील पारितोषिक मिळालेले नाही. या नाटकांना पारितोषिके मिळाली नसली तरी त्यांच्यासाठी बेस्ट लक नेस्ट टाईम इतकेच म्हणावे लागेल असे इनामदार यांचे म्हणणे आहे.