नव्या कळवा खाडीपुलामुळे वाहतूक कोंडीत पडणार भर चिंचोळ््या बोगद्याचा परिणाम : घोडबंदर रोडची होणारा पुनरावृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 05:14 PM2018-01-16T17:14:54+5:302018-01-16T17:21:28+5:30

कळवा खाडीवरील नव्या पुलाचे काम वेगाने सुरु आहे. परंतु ज्या ठिकाणी हा पुल खाली उतरविण्यात आला आहे. तेथून हाकेच्या अंतरावर विटावा सबवे असून तो अतिशय चिंचोळा असल्याने या ठिकाणी पुन्हा कोंडी फुटण्याऐवजी वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.

The result of the turbulent tunnel, due to the new report, will be in the traffic jam: the rotation of Ghodbunder Road | नव्या कळवा खाडीपुलामुळे वाहतूक कोंडीत पडणार भर चिंचोळ््या बोगद्याचा परिणाम : घोडबंदर रोडची होणारा पुनरावृत्ती

नव्या कळवा खाडीपुलामुळे वाहतूक कोंडीत पडणार भर चिंचोळ््या बोगद्याचा परिणाम : घोडबंदर रोडची होणारा पुनरावृत्ती

Next
ठळक मुद्देपुलाचा मार्ग वाढविण्याची मागणीवाहनांची वर्दळ अधिक संख्येने वाढणार

ठाणे : ठाणे कळवा खाडीवर उभारण्यात येणाऱ्या  तिसऱ्या पुलाचे काम आता मार्गी लागत असले तरी हा पूल जेथे उतरत आहे तेथून पुढे असलेल्या विटावा बोगद्याच्या चिंचोळ्या मार्गामुळे पुन्हा कोंडी होण्याची भीती व्यक्त होत आहे. घोडबंदर मार्गावरील पूल जेथे संपतात व नवा पूल सुरु होतो त्या जंक्शनपाशी वाहतूक कोंडी होत असल्याने त्याचा फटका वाहन चालकांना बसत आहे. त्यामुळे ठाणे-कळवा खाडीवरील पुलाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच यावर तोडगा काढला जावा, अशी आशा व्यक्त होत आहे.
                    मुंबईतील सी लिंकच्या धर्तीवर ठाणे महापालिकेने विटावा पुलाखालील वाहतूक कोंडी सुटावी यासाठी या कळवा खाडी पुलावर तिसरा नवीन पुलाच्या कामाचा प्रस्ताव जानेवारी २०१२ मध्ये मांडला होता. सध्या कळवा खाडीवर एक ब्रिटीशकालीन आणि आणखी एक पूल आहे. परंतु ब्रिटीशकालीन पूल कमकुवत झाल्याने त्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे दुसऱ्या  पुलावरील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. हा दुसरा पूल वाहतुकीसाठी कमी पडू लागल्याने पालिकेने तिसऱ्या  पुलाचा पर्याय मांडला. महापालिकेने २०११-१२ या आर्थिक वर्षात यासाठी १० कोटींची तरतूद केली होती. आता या पुलासाठी १८३ कोटींचा खर्च केला जाणार आहे.
          जुन्या दोन पुलांच्या बाजूलाच मात्र त्यांच्यापेक्षा थोड्या उंचीवर हा पूल उभारण्यात येणार आहे. ठाण्याकडून विटाव्याकडे जाण्यासाठी हा वन-वे पूल असणार आहे तर विटाव्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी जुन्या पुलाचा पर्याय उपलब्ध आहे. या तिसऱ्या पुलामुळे येथील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. ठाण्याकडून खारेगांव (मनिषा नगर) आणि विटाव्याच्या पुढे म्हणजेच ठाणे - बेलापूर दिशेला असा दोनही मार्गाने हा पूल खाली उतरणार आहे. तसेच कळव्याकडून ठाण्याकडे येतांना हा पूल साकेत, जेल तलाव आणि कोर्टनाका मार्गे ठाणे स्टेशनकडे खाली उतरणार आहे. तसेच आता यात थोडा बदल करण्यात आला असून, आत्माराम चौकापर्यंत रस्ता या पुलाला जोडण्यात येणार आहे.
केबल स्टेड टाईपचा हा पूल असणार असून तो दीड कि.मी. लांबीचा असणार आहे. यामुळे विटाव्या पुलाखालील आणि कळवा नाक्यावर होणारी वाहतूक कोंडी फुटणार असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.
       आजच्या घडीला या मार्गावरुन विटावा नवी मुंबईकडे जाणाºया वाहनांची संख्या ही दिवसाला ५० ते ६० हजारांच्या आसपास आहे. ऐरोली मार्गे जावे लागल्यास त्या ठिकाणी दोन टोल भरावे लागत आहेत. त्यामुळे भविष्यात या फ्रीवेचाच वापर अधिक होणार आहे. नवा ब्रीज सुरु झाल्यानंतर वाहनांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. नवा ब्रीज हा कळवा हॉस्पिटलच्या ठिकाणी उतरवण्यात येणार असून तेथून पुढे विटाव्या पुलाचा चिंचोळा मार्ग आहे. या पुलावरुन येणारी वाहतुक येथे येऊन तिला ब्रेक लागणार आहे. त्यामुळे या नव्या पुलावरुन आतापासूनच तर्कविर्तक केले जाऊ लागले आहेत. घोडबंदर मार्गावर रस्ते चार पदरी असतांना या ठिकाणी जेथे पूल खाली उतरतात, त्याठिकाणी वाहतूक कोंडी होतांना दिसते. भविष्यात या नव्या पुलामुळे हीच परिस्थितीत विटावा बोगद्याजवळ उदभवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


 

Web Title: The result of the turbulent tunnel, due to the new report, will be in the traffic jam: the rotation of Ghodbunder Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.