भिवंडीत माहिती अधिकार अर्ज टाकल्याच्या रागातून सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षकाला बेदम मारहाण

By नितीन पंडित | Published: April 22, 2023 07:33 PM2023-04-22T19:33:28+5:302023-04-22T19:33:47+5:30

याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Retired assistant police inspector brutally beaten up in Bhiwandi for filing RTI application | भिवंडीत माहिती अधिकार अर्ज टाकल्याच्या रागातून सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षकाला बेदम मारहाण

भिवंडीत माहिती अधिकार अर्ज टाकल्याच्या रागातून सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षकाला बेदम मारहाण

googlenewsNext

भिवंडी - ग्रामपंचायत कार्यालयात माहिती अधिकार अधिनियमांतर्गत माहिती मागितल्याचा राग आल्याने तिघांनी सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षकाला बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी कांबे गावात घडली. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुभाष सिताराम रापटे वय ६७ वर्ष रा. कांबेगाव असे मारहाण झालेल्या सेवानिवृत्त सहाय्य पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.सुभाष रापटे यांनी कांबे ग्रामपंचायतमध्ये माहितीचा अर्ज दाखल केला होता. ही माहिती आपल्या बद्दलच आहे असा आरोप करत कांबे गावातील वैभव सुरेश पालकर वय ३७ वर्ष, सुरेश बाळकृष्ण पालकर व लता सुरेश पालकर यांनी सुभाष रापटे हे ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर उभे असताना त्यांना लोखंडी रॉड व पावरलूम च्या लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली आहे. 

या मार्गाने सुभाष रापटे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून निजामपुरा पोलिसांनी आरोपी वैभव पालकर यास रात्री अटक केली आहे.
 

Web Title: Retired assistant police inspector brutally beaten up in Bhiwandi for filing RTI application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.