बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवून सेवानिवृत्ती, 19 वर्षांपूर्वी मिळवली नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 08:38 AM2022-03-27T08:38:35+5:302022-03-27T08:39:00+5:30

उल्हासनगर महापालिकेत जन्मतारखेत फेरफार करून १९ वर्षांपूर्वी जनसंपर्क अधिकाऱ्याची नोकरी मिळविल्याचा प्रकार उघड होऊन युवराज भदाणे याच्याविरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Retired by showing fake medical certificate, got the job 19 years ago | बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवून सेवानिवृत्ती, 19 वर्षांपूर्वी मिळवली नोकरी

बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवून सेवानिवृत्ती, 19 वर्षांपूर्वी मिळवली नोकरी

Next

उल्हासनगर :  सर जे. जे. स्थायी वैद्यकीय मंडळ व ज. जी. समूह रुग्णालयाचे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र महापालिकेला सादर करून सेवानिवृत्ती घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांविरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. इतर सुविधा व सेवानिवृत्ती वेतन बंद करण्याचे संकेत महापालिकेने दिले आहेत.

उल्हासनगर महापालिकेत जन्मतारखेत फेरफार करून १९ वर्षांपूर्वी जनसंपर्क अधिकाऱ्याची नोकरी मिळविल्याचा प्रकार उघड होऊन युवराज भदाणे याच्याविरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने भदाणे एका महिन्यापासून फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणापाठोपाठ दोन सफाई कर्मचाऱ्यांनी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र महापालिकेला सादर करून सेवानिवृत्ती घेतल्याचा प्रकार उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. रंजनी दिनेश वाल्मिकी या सफाई कामगार म्हणून २६ सप्टेंबर २०१२ रोजी कामाला लागल्या. त्यांनी २६ एप्रिल २०१८ रोजी वैद्यकीय सेवानिवृत्तीचा अर्ज महापालिकेला सादर केला. १२ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांचा वैद्यकीय अहवाल महापालिकेला मिळाला. त्यानुसार २६ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांना वैद्यकीय सेवानिवृत्ती देण्यात आली; तर दुसऱ्या घटनेत ५ ऑगस्ट २००८ मध्ये संगीता रमेश आगळे या सफाई कामगार म्हणून महापालिकेत कामाला लागल्या. २२ मे २०१८ रोजी आगळे यांनी वैद्यकीय सेवानिवृत्तीसाठी अर्ज केला. शारीरिकदृष्ट्या पात्र आहेत की नाही, यासाठी जे. जे. रुग्णालय येथे तपासणी करून घेण्यासाठी महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले. ५ ऑगस्ट  २०२० रोजी तपासणी अहवाल महापालिकेला मिळाल्यानंतर १८ डिसेंबर २०२० रोजी वैद्यकीय सेवानिवृत्ती देण्यात आली. 

फेरतपासणीत उघड; फसवणुकीचा गुन्हा
nमहापालिकेने वैद्यकीय प्रमाणपत्र जे. जे. स्थायी वैद्यकीय मंडळाकडे 
फेरतपासणीसाठी 
पाठविल्यानंतर दोन्ही प्रमाणपत्रे बनावट असल्याचे उघड झाले. 
nअखेर पालिकेचे सहायक आयुक्त अच्युत सासे यांच्या तक्रारीवरून संगीता आवळे व रंजनी वाल्मिकी यांनी 
महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. 
nअसे प्रकार पालिकेत घडले असून, याबाबतची अधिक चौकशी करण्याचे संकेत उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिले आहेत.

Web Title: Retired by showing fake medical certificate, got the job 19 years ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.