ठाणे जिल्हा परिषदेचे निवृत्त कर्मचारी वेतनापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 03:48 PM2020-12-15T15:48:41+5:302020-12-15T15:51:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना महिन्याच्या पहिल्या तारखेला निवृत्तीवेतन देण्याचे शासनाचे आदेश असूनही ठाणे जिल्हा परिषदेमधून निवृत्त ...

Retired employees of Thane Zilla Parishad deprived of salary | ठाणे जिल्हा परिषदेचे निवृत्त कर्मचारी वेतनापासून वंचित

नोव्हेंबरपासून निवृत्तीवेतनाची प्रतिक्षा

Next
ठळक मुद्दे नोव्हेंबरपासून निवृत्तीवेतनाची प्रतिक्षा वेतन तातडीने देण्यासाठी सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचे साकडे


लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना महिन्याच्या पहिल्या तारखेला निवृत्तीवेतन देण्याचे शासनाचे आदेश असूनही ठाणेजिल्हा परिषदेमधून निवृत्त झालेल्या विविध संवर्गातील कर्मचाºयांना नोव्हेंबरपासून निवृत्ती वेतन मिळाले नाही, अशी माहिती जिल्हा परिषदेचे सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेचे सल्लागार रामचंद्र मडके यांनी दिली. या कर्मचाºयांचे निवृत्ती वेतन राज्य शासनाने तातडीने द्यावे, अशी मागणी राज्य शासनाकडे त्यांनी केली आहे.
सेवा निवृत्तीनंतर अनेक कर्मचाºयांसाठी निवृत्ती वेतनाचा आधार असतो. अनेकांना काही व्याधी असल्यामुळे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असतात. घरातील वयोवृद्धांनाही औषधोपचाराची गरज असते. दरमहा मिळणाºया निवृत्ती वेतानामधून अनेक कर्मचारी आपला हा खर्च भागवित असतात. निवृत्तीवेतन वेळेवर मिळाले नाही तर महिन्याचे संपूर्ण नियोजन कोलमडते. त्यातच कोरोना संसर्ग अजूनही सुरू आहे. निवृत्त कर्मचाºयांना उपनगरी रेल्वेतून प्रवासाला मुभा नाही. अशा परिस्थितीमध्ये निवृत्त कर्मचारी ठाण्यातील मुख्यालयातही विचारणा करण्यासाठी जाऊ शकत नाही. खासगी वाहनाने प्रवास करूनही अधिकारी भेटतीलच याची शाश्वती नाही. अशा अनेक कारणांमुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडणे जोखमीचे असल्याने ग्राम विकास विभागाने जिल्हा परिषद कर्मचाºयांचे वेतन देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी मडके यांनी केली आहे.

Web Title: Retired employees of Thane Zilla Parishad deprived of salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.