१ जून रोजीचा उत्तन बंद मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 01:21 AM2018-05-29T01:21:33+5:302018-05-29T01:21:33+5:30

Retro on June 1 | १ जून रोजीचा उत्तन बंद मागे

१ जून रोजीचा उत्तन बंद मागे

Next

मीरा रोड : बेकायदा कचरा डम्पिंगविरोधात धारावी बेट जनआक्र ोश समितीने १ जून रोजी दिलेली ‘उत्तन बंद’ची हाक सोमवारी पालिका आयुक्तांसोबतच्या बैठकीत आंदोलन समितीच्या सदस्यांनी मागे घेतली. आयुक्तांनी शहरात २० जागांवर लहान प्रकल्प उभारण्याचे आश्वासन देत पुन्हा वेळ मागून घेतली. त्यानुसार, १५ दिवसांनी आयुक्तांनी पर्यायी कचरा व्यवस्थेबद्दल केलेल्या उपाययोजनांची माहिती बैठक घेऊन द्यावी. जर समाधान झाले नाही, तर आंदोलन करू, अशी भूमिका समितीने घेतली. त्यामुळे १ जून रोजीचे आंदोलन बारगळले आहे. याआधीही १ मे पासून डम्पिंग बंदचा इशारा समितीने दिला होता, मात्र तो स्थगित केला होता.
मीरा-भार्इंदर महापालिका ही शहराचा रोजचा सुमारे ४५० टन कचरा हा उत्तनच्या धावगी येथे कुठलीही प्रक्रि या न करताच टाकत आहे. १० वर्षांपासून पालिकेने अशाच प्रकारे प्रक्रि या न करता टाकलेला बेकायदेशीर कचरा आजही तसाच पडून आहे. शहरात ओला व सुका कचरा वेगळा करणे, त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे, वेगवेगळे लहान प्रकल्प उभारणे, यासोबतच कचरा प्रकल्प स्थलांतरित करण्यातदेखील पालिका सपशेल अपयशी ठरली आहे . याविरोधात धारावी बेट जनआक्र ोश मोर्चा स्थापन करून १ मे रोजी कचऱ्याच्या गाड्या अडवण्याचे आंदोलन जाहीर करण्यात आले होते. पालिकेत झालेल्या बैठकीतून काहीच निष्पन्न न झाल्याने अखेर १ जून रोजी उत्तन बंद व उत्तन पोलीस ठाण्यात जाऊन महापालिका अधिकारी, ठेकेदार यांच्याविरोधात नागरिकांनी फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्याचे जाहीर केले होते. उत्तन भागात तर अनेक ठिकाणी बंदची पत्रके वाटण्यात आली. रविवारी यासंदर्भात बैठकदेखील झाली.
दरम्यान, आज सोमवार २८ मे रोजी समितीच्या सदस्यांची आयुक्त बालाजी खतगावकर व अन्य अधिकारी यांच्यासोबत महापालिकेत बैठक झाली. यावेळी सहायक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, आंदोलन समितीचे समन्वयक लिओ कोलासो, नगरसेविका हेलन गोविंद, शर्मिला बगाजीसह जेनवी अल्मेडा, रेनॉल्ड बेचरी, विद्याधर रेवणकर, एडविन घोन्सालवीस, एडवर्ड कोरिया, इग्नेशियस अल्मेडा उपस्थित होते.
उत्तन कचरा प्रकल्प तातडीने बंद करणे शक्य नसून तसे झाल्यास संपूर्ण शहरात कचºयाची समस्या बिकट होईल, असे आयुक्तांनी या वेळी सांगितले. आयुक्तांनी केलेल्या विनंतीनुसार व त्यांनी घेतलेली भूमिका सकारात्मक वाटल्याने १ जून रोजीचा बंद तसेच पोलीस ठाण्यात जाऊन तक्र ारी देण्याचे आंदोलन स्थगित केल्याचे रेनॉल्ड बेचरी, विद्याधर रेवणकर यांनी सांगितले.

Web Title: Retro on June 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.