एक लाख ९० हजारांचे दागिने प्रवाशांना परत

By admin | Published: January 6, 2017 06:11 AM2017-01-06T06:11:39+5:302017-01-06T06:11:39+5:30

रेझिंग डे’ चे औचित्य साधून ठाणे लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे प्रवासादरम्यान चोरीला गेलेला वेगवेगळ्या गुन्ह्यांतील सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल १७

The return of one lakh 90 thousand ornaments to the passengers | एक लाख ९० हजारांचे दागिने प्रवाशांना परत

एक लाख ९० हजारांचे दागिने प्रवाशांना परत

Next

ठाणे : ‘ रेझिंग डे’ चे औचित्य साधून ठाणे लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे प्रवासादरम्यान चोरीला गेलेला वेगवेगळ्या गुन्ह्यांतील सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल १७ तक्रारदारांना हस्तांतरित केला आहे. यामध्ये मोबाइल फोन, सोन्याचे दागिने आदींचा समावेश आहे.
‘रेझिंग डे’ हा कार्यक्र म सर्वच पोलीस ठाण्यांत मोठ्या उत्साहात साजरा होतो. त्यानुसार, ठाणे लोहमार्ग पोलिसांनी त्याचे औचित्य साधून शाळा, महाविद्यालयांतील तरु ण मंडळींना रेल्वे प्रवासादरम्यान कशा प्रकारे काळजी घ्यावी तसेच पोलीस ठाण्याचे दैनंदिन कामकाज कशा प्रकारे चालते, तसेच महिलांसंदर्भात वाढत असलेल्या गुन्ह्यांसंदर्भातही मार्गदर्शन केले. त्याचबरोबर रेल्वे रुळांलगतच्या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या वस्त्यांमध्ये जाऊन त्यांना धावत्या लोकल ट्रेनवर दगड फेकू नये. टवाळखोर मुले जर तसा प्रयत्न करत असतील, तर तत्काळ हेल्पलाइन क्र मांकावर संपर्क साधावा, असे आवाहन या वेळी पोलिसांनी केले आहे.
गुरुवारी पोलीस ठाण्यात १७ जणांना मोबाइल फोन, सोन्याचे दागिने असा एक लाख ९० हजारांचा ऐवज वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दळवी, पोलीस निरीक्षक सुरेश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The return of one lakh 90 thousand ornaments to the passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.