प्रसूतीतज्ज्ञाअभावी गर्भवतीस उपचाराविना पाठविले परत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 12:15 AM2018-10-22T00:15:58+5:302018-10-22T00:16:06+5:30

नागरिकांना स्मार्ट सिटीची स्वप्ने दाखवणाऱ्या केडीएमसीच्या आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाल्याची प्रचिती रविवारी पुन्हा एकदा आली.

Returned without sending a pregnant woman without treatment | प्रसूतीतज्ज्ञाअभावी गर्भवतीस उपचाराविना पाठविले परत

प्रसूतीतज्ज्ञाअभावी गर्भवतीस उपचाराविना पाठविले परत

Next

कल्याण : नागरिकांना स्मार्ट सिटीची स्वप्ने दाखवणाऱ्या केडीएमसीच्या आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाल्याची प्रचिती रविवारी पुन्हा एकदा आली. प्रसूतीसाठी आलेल्या एका गर्भवती महिलेला प्रसूतीतज्ज्ञ नसल्याने परत पाठवल्याचा प्रकार डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात घडला आहे. या प्रकाराबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, सोमवारी या पक्षाचे शिष्टमंडळ आयुक्त गोविंद बोडके यांना भेटणार आहे.
कल्याणच्या रुक्मीणीबाई रुग्णालयासह डोंबिवलीतील शास्त्रीनगर रु ग्णालयातील बाह्यरुग्ण विभागामध्ये दररोज ८०० हून अधिक रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र तज्ज्ञ डॉक्टर आणि पुरेशा कर्मचाºयांअभावी बहुतांश वेळा गंभीर रुग्णांना ठाणे, मुंबईची वाट धरावी लागते. प्राथमिक उपचारांचीही सोय नसल्याने ही रुग्णालये निरुपयोगी ठरली आहेत. तज्ज्ञ डॉक्टर आणि अन्य रिक्त जागांचा आकडा ८०-९० च्या आसपास आहे. ही पदे भरण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून अनेकदा प्रयत्न करण्यात आले; मात्र अपुरे वेतन आणि काही अटी-शर्तींमुळे येथील रुग्णालयांमध्ये सेवा देण्यासाठी कुणी येत नाही. भरतीला प्रतिसाद मिळत नसून, कामाच्या ताणामुळे कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती घेत असल्याने आरोग्यव्यवस्था कोलमडली आहे. आजच्या घडीला शास्त्रीनगर रुग्णालयातील बहुतांश महत्त्वाचे विभाग बंद पडले आहेत. कल्याणची स्थिती फारशी वेगळी नाही. महापालिकेचे डोंबिवलीतील सूतिकागृह अनेक वर्षे बंद आहे. हे सूतिकागृह सुरू करण्याची मागणी होत आहे. रुग्णालयासाठी निधीची तरतूद शिवसेना-भाजपाने वेळोवेळी केली असली, तरी आरोग्यसेवा सुधारण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आली नाहीत. गर्भवती महिलांची परवड लक्षात घेता, वास्तूचे नूतनीकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी तत्परतेने कारवाई झाली नाही.
>स्त्री रोगतज्ज्ञाची
११ पदे रिक्त
सद्य:स्थितीत एकच स्त्री रोगतज्ज्ञ कार्यरत आहे. स्त्री रोगतज्ज्ञाची एकूण १२ पदे असून यातील ११ रिक्त आहेत. रोटेशनमुळे रविवारी संबंधित डॉक्टर उपलब्ध झाले नसतील, डॉक्टरांच्या कमतरतेबाबत सामान्य प्रशासन विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सोमवारी आयुक्तांच्या आढावा बैठकीत हा मुद्दा पुन्हा एकदा मांडण्यात येईल, अशी प्रतिक्रिया मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजू लवंगारे यांनी व्यक्त केली.
>मनसेने नोंदवला निषेध
केडीएमसीत २० वर्षांहून अधिक काळ सेना-भाजपाची सत्ता राहिली आहे. कल्याणचे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे हे डॉक्टर आहेत. महापौर विनीता राणे यांनी मुंबई महापालिकेच्याच नायर रुग्णालयात प्रदीर्घ काळ सेवा बजावली आहे. त्यामुळे पालिकेच्या आरोग्यसेवेची त्यांना जाण आहे. रुग्णसेवेशी निगडित असलेली जबाबदार व्यक्ती महापौरपदावर असताना रुग्णांची होत असलेली परवड निषेधार्ह असल्याचे मत मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी व्यक्त केले.

Web Title: Returned without sending a pregnant woman without treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.