बदलापूरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 06:15 PM2018-02-28T18:15:08+5:302018-02-28T18:15:08+5:30
बदलापूर आपटेवाडी भागात राहणा-या एका 14 वर्षीय मुलीवर तिघा तरुणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींना अटक करण्यात आले असून त्यातील एक आरोपी अल्पवयीन आहे.
बदलापूर : बदलापूर आपटेवाडी भागात राहणा-या एका 14 वर्षीय मुलीवर तिघा तरुणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींना अटक करण्यात आले असून त्यातील एक आरोपी अल्पवयीन आहे.
गणेशनगर आपटेवाडी भागात राहणा-या एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच ओळखीच्या तिघा तरुणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. या तिघा आरोपींनी पीडित मुलीला शिरगांव येथील पनवेल हायवेवर बोलाविले. हा हायवे सुमासार असल्याने भर दिवसा या तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. या प्रकारानंतर घाबरलेली पिडीत मुलगी दोन दिवस बेपत्ता झाली होती. तिच्या पालकांनी या प्रकरणाची तक्रार दिली होती. तिचा शोध घेतल्यावर पोलिसांना गडलेल्या प्रकाराची माहिती पीडित मुलीने दिले. तिच्यावर ज्यांनी हा अत्याचार केला. त्यात रविंद्र सांजेकर (24) आणि अहमद खान (18) यांचा समावेश होता. त्या दोघांच्या जोडीला आणखी एक अल्पवयीन तरुण आरोपी आहे. या तिघांची नावे समोर आल्यावर पोलिसांनी तत्काळ या तिघांना अटक केली आहे. पोक्सा अंतर्गत या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना कल्याण सत्र न्यायालयात हजर केले असता तिघांनाही 6 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, हा या पीडित मुलीवर ज्या ठिकाणी बलात्कार करण्यात आला तो पनवेल हायवे आधीपासुनच वादग्रस्त आहे. या ठिकाणी जास्त रहदारी नसल्याने अनेक जोडपे याच ठिकाणी निवांत शोधत येत असतात. त्यातुनच अनेक चुकीचे प्रकार या परिसरात घडत आहे. दिवसाच नव्हे तर रात्रीच्या वेळी देखील या भागात अनेक जोडपे बसलेले असतात. त्यामुळे या भागात पोलिसांची पेट्रोलिंग वाढविण्याची गरज व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा तपास करीत असतांना पीडित मुलीकडुन आनखी काही माहिती मिळते का याचा पोलीस शोध घेत आहेत.