महसूल विभागाची १९५ गोदामांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:38 AM2021-03-06T04:38:10+5:302021-03-06T04:38:10+5:30
भिवंडी : महसूल विभागाकडून प्रत्येकवर्षी आर्थिक वर्ष अखेरीस महसूल वसुलीसाठी जोरदार मोहीम राबवली जात आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ...
भिवंडी : महसूल विभागाकडून प्रत्येकवर्षी आर्थिक वर्ष अखेरीस महसूल वसुलीसाठी जोरदार मोहीम राबवली जात आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी भिवंडी तालुक्यासाठी २०२० - २१ या आर्थिक वर्षासाठी जमीन महसुलाचे ९५ कोटी रुपये तर गौणखनिज उत्पन्न १५ कोटी ५० लाख वसुलीचे इष्टांक देण्यात आलेला आहे. दरम्यान, थकबाकी न भरलेल्या १९५ गोदामांवर जप्तीची कारवाई केली आहे.
भिवंडीचे उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर व तहसीलदार अधिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तालुक्यात वसुलीची धडक कार्यवाही सुरू केली आहे. या अंतर्गत तालुक्यातील ज्या खातेदारांनी मागील वर्षापर्यंत देय असलेली रक्कम भरलेली नाही अशांच्या स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करुन सील करण्याची कारवाई सुरू केली आहे. त्यामध्ये मौजे कारिवली, काल्हेर, खोणी, पूर्णा, सोनाळे, कोन, अंजूर, वडपे येथे कारवाई करून १९५ गोदामे, एक कंपनी आणि एक सॉ मिल इत्यादींवर कारवाई केली आहे.
गोदाम मालकांसह ज्या नागरिकांनी थकबाकी भरलेली नाही त्यांनी ती भरावी अन्यथा कारवाई अधिक तीव्र करण्यात येईल अशी प्रतिक्रिया डॉ. नळदकर यांनी दिली आहे.
===Photopath===
050321\img-20210304-wa0040.jpg
===Caption===
भिवंडीत महसूल विभागाची १९५ गोदामांवर जप्तीची कारवाई