महसूल कर्मचाऱ्यांना ‘बाप्पा पावला’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 01:16 IST2019-09-07T01:16:15+5:302019-09-07T01:16:29+5:30
अधिकाऱ्यांना २२५७ होमगार्डचे सुरक्षाकवच : कामे खोळंबल्याने नागरिकांत नाराजी

महसूल कर्मचाऱ्यांना ‘बाप्पा पावला’
सुरेश लोखंडे
ठाणे : जिल्हाधिकाºयांच्या नियंत्रणातील महसूलच्या अव्वल कारकुनांसह प्रमोटेड नायब तहसीलदार, लिपीक, कोतवाल आणि शिपाई हे गुरुवारपासून बेमुदत संपावर आहेत. यामुळे कर्मचारी कार्यालयात येऊन हजेरी लावून सुटीचा आनंद घेत आहेत. या कालावधीत अनेक जण गणेशोत्सवात मित्र, नातेवाईकांच्या घरी जावून बाप्पाचे दर्शन घेत आहेत. अनेक कर्मचारी गृपने मुंबईत लालबागचा राजा, गणेशगल्ली, चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहून सुटीचा लाभ घेत असल्याचे दिसत होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा संप मागे घेण्यात आला. प्रमुख मागणी मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांनी मान्य केल्याने या कर्मचाºयांना बाप्पा पावला आहे.
जिल्हाधिकाºयांच्या दालनासह जिल्ह्यातील चार प्रांत व सात तहसीदारांच्या दालनांची जबाबदारी जिल्हाभरात दोन हजार २५७ गृहरक्षक दलाचे जवान (होमगार्ड) पार पाडत आहेत. अधिकाºयांना सुरक्षाकवच असले तरी या कार्यालयांमध्ये नागरिकांचे मात्र हाल होत आहेत.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रांत आॅफिस, तहसीलदारांसह कल्याण, भिवंडी आणि उल्हासनगर येथील उपविभागीय अधिकारी (प्रांत) आणि सात तहसीलदार कार्यालयांच्या नियंत्रणातील सुमारे ७२१ जण कर्मचारी राज्यस्तरीय बेमुदत संपात सहभागी आहेत. यामुळे कार्यालयात उपस्थित असलेल्या राजपत्रित अधिकाºयांच्या दालनाच्या सुरक्षेसह अन्यही फाईलची नेआण करण्यासाठी तब्बल दोन हजार २२७ होमगार्ड तैनात केले आहेत.
यामध्ये दोन हजार एक पुरुष होमगार्ड व २५६ महिला होमगार्ड या अधिकाºयांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडत आहेत.
विद्यार्थी - नागरिकांचे हाल
शासनाला दिवसाला करोडो रूपयांचा महसूल मिळवून देणाºया रेती, खडी आदी गौणखनिज शाखेसह अन्यही विभागातील कर्मचारी या संपात आहेत. मुद्रांकशुल्क विभागाचे कर्मचारी मात्र या संपात नसल्यामुळे तो शासनाला मिळेल. तर वर्षाकाठी सुमारे १०५ कोटी देणारारमणूककर विभाग गेल्या काही वर्षांपासून बंद आहे. तलाठी कार्यालयांचे कर्मचारीही संपात आहेत. यामुळे महसूल येत असला तरी तलाठ्यांचे इतर कामे करण्यास कर्मचाºयांची उपस्थिती नसल्यामुळे महसूल भरणाही रखडलेला आहे. उर्वरित विभाग नागरिकांच्या कामकाजाशी संबंधीत असल्यामुळे त्यांचे मात्र या संपामुळे हाल होत असल्याचे वास्तव जिल्ह्यात दिसून येत आहे. फेस्टिवल मूड असल्यामुळे कर्मचारी गणेशोत्सवात रमलेला आहे. तर महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी दाखल्यांसाठी विद्यार्थी व पालकांचे मात्र हाल होत आहेत.
महसूल कर्मचाºयांविषयी तीव्र संताप
ठाणे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत वाघचौडे, गव्हाळे यांच्यासह ऋषिकेश कुलकर्णी, प्रकाश बनसोडे, गिरीष काळे, प्राची चाचड, विजय सकपाळ, कांचन शिरभाते आणि राजू पाटील आदीपदाधिकाºयांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी बैठक झाली.
मात्र, पदाधिकारी राग काढण्याच्या भितीने काही कर्मचाºयांनी तीस हजेरी लावून घरी काढता पाय घेतला. या दरम्यान या कार्यालयांमध्ये विविध कामानिमित्त आलेल्या नागरिकांकडून साधे अर्जदेखील कर्मचाºयांनी घेतले नाहीत.
ते बरोबर किंवा कसे याचे मार्गदर्शनही केले नाही.
तर सेतू कार्यालयांमध्ये स्वाक्षरीअंती पडून असलेल्या फाईली पुढे ही सरकल्या नाहीत. तर डिजिटल स्वाक्षरीदेखील तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ठिकठिकाणी होऊ शकल्या नाहीत. यामुळे दाखल्यांसह विविध कामे प्रांतांसह तहसीलदार कार्यालयांमध्ये अडकून पडले आहेत.