कोरोनातही शासनाला एकाच दिवसात पावणेचार कोटींचा महसूल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:42 AM2021-04-02T04:42:59+5:302021-04-02T04:42:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणो : कोरोनाचे सावट असतानाही त्याचा घर, जमीन खरेदीवर कोणताही परिणाम झालेला नाही. बुधवारी आर्थिक वर्षाच्या ...

Revenue of Rs. | कोरोनातही शासनाला एकाच दिवसात पावणेचार कोटींचा महसूल !

कोरोनातही शासनाला एकाच दिवसात पावणेचार कोटींचा महसूल !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणो : कोरोनाचे सावट असतानाही त्याचा घर, जमीन खरेदीवर कोणताही परिणाम झालेला नाही. बुधवारी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी दिवसभरात तीन कोटी ७५ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा महसूल शासन जमा झाला.

जिल्ह्यातील नऊ उपनिबंधक (रजिस्टार) कार्यालयामध्ये घर खरेदी, विक्रीसह जमीन, शेतीवाडीच्या खरेदी-विक्रीचा व्यवहारात तेजी आल्याचे जाणकारांनी सांगितले. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व उपनिबंधक कार्यालयात मालमत्ता खरेदी, विक्रीचे तब्बल ३०७ दस्तऐवज नोंदण्यात आले. यापोटी मुद्रांक शुल्काद्वारे दोन कोटी ६८ लाख १० हजार रुपयांचा महसूल शासनास मिळाला. शिवाय या व्यवहारातून शासनाला एक कोटी सात लाख ३५ हजार ५०० रुपये नोंदणी शुल्काची रक्कम प्राप्त झाली.

शासनाकडून मुद्रांक शुल्कापोटी ६ टक्के रक्कम वसूल करण्यात येत होती. मात्र कोरोनामुळे बांधकाम व्यवसायाला फटका बसल्याने त्यात घट करून ४ टक्के केली होती. या सवलतीचा लाभ घेण्याचा बुधवार हा शेवटचा दिवस होता.

........

वाचली

Web Title: Revenue of Rs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.