प्राणवायू तुटवड्यावर ‘ऑक्सिजन कॉन्संट्रेटर’ ठरणार संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:42 AM2021-04-23T04:42:51+5:302021-04-23T04:42:51+5:30

ठाणे : प्राणवायूच्या तुटवड्यामुळे रुग्णांना नाहक जीव गमवावा लागत आहे.या परिस्थितीत हवेतील प्राणवायू शोषून रुग्णाला ते नाकावाटे पुरवणारी ...

Revitalization will be an 'oxygen concentrator' in case of oxygen shortage | प्राणवायू तुटवड्यावर ‘ऑक्सिजन कॉन्संट्रेटर’ ठरणार संजीवनी

प्राणवायू तुटवड्यावर ‘ऑक्सिजन कॉन्संट्रेटर’ ठरणार संजीवनी

Next

ठाणे : प्राणवायूच्या तुटवड्यामुळे रुग्णांना नाहक जीव गमवावा लागत आहे.या परिस्थितीत हवेतील प्राणवायू शोषून रुग्णाला ते नाकावाटे पुरवणारी ऑक्सिजन कॉन्संट्रेटर यंत्रे संजीवनी ठरत आहेत. ही यंत्रे ठाण्यातील कोविड रुग्णांसाठी मिळावीत यासाठी ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय केळकर यांनी आमदार निधी दिला आहे. या यंत्रांमुळे शेकडो रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना दिलासा मिळणार आहे.

सध्या राज्यासह ठाणे शहरात प्राणवायूचा तुटवडा जाणवत आहे. केळकर यांनी जिल्हा नियोजन समितीला पत्र देऊन ठाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयांना ऑक्सिजन कॉन्संट्रेटर यंत्रे खरेदीसाठी ३० लाखांचा आमदार निधी दिला आहे. महापालिकेच्या पार्किंग प्लाझा, व्होल्टास, ग्लोबल यांसारख्या कोविड रुग्णालयांत शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत. काही रुग्णांना प्राणवायू नसल्याने दाखल करून घेतले जात नाही. प्रसंगी रुग्णांना अन्य रुग्णालयांत हलवले जाते. या ओढाताणीत रुग्णांच्या जिवावर बेतू शकते. विजेवर चालणाऱ्या या यंत्राची ४५ हजार ते एक लाखापर्यंत किंमत आहे. डॉक्टरांच्या निगराणीखाली ते वापरायचे आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

सिव्हिल रुग्णालयासाठी २० लाखांचा निधी

केळकर यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयास विविध वैद्यकीय सुविधांसाठी २० लाखांचा निधी दिला आहे. या रुग्णालयातही शेकडो कोविड रुग्ण आहेत. त्यांच्या सोयी-सुविधांसाठी निधी दिल्याचे केळकर यांनी सांगितले. येथील डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांनाही समतोल फाउंडेशनच्या सहकार्याने रोज मोफत जेवणाची व्यवस्था रुग्णालयात केल्याची माहितीही केळकर यांनी दिली.

काय आहे ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशीन?

कोरोनाबाधित रुग्णाची शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी हाेते. अशावेळी त्याला कृत्रिम ऑक्सिजन नाकावाटे पुरविण्याची गरज असते. हवेत २० ते २१ टक्के ऑक्सिजन असतो. हवेतील प्राणवायू शोषून रुग्णाला नाकावाटे देण्याचे काम हे यंत्र करते. रुग्णाला आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन देण्यासाठी या यंत्रात एका नॉबची व्यवस्था असते. सध्या ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता जाणवत असताना हे यंत्र रुग्णांचे जीव वाचवू शकते.

Web Title: Revitalization will be an 'oxygen concentrator' in case of oxygen shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.