रिव्हॉल्व्हरची तस्करी करणाऱ्याला अटक: रिव्हॉल्व्हर हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 11:27 PM2021-06-22T23:27:09+5:302021-06-22T23:29:19+5:30
बेकायदेशीररित्या रिव्हॉल्व्हरची तस्करी करणाºया प्रकाश जाधव (३५, रा. भातसई, ता. शहापूर, ठाणे) याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने सोमवारी भिवंडी येथून अटक केली. त्याने हे रिव्हॉल्व्हर कोठून आणि कोणाकडून आणले? याचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: बेकायदेशीररित्या रिव्हॉल्व्हरची तस्करी करणाºया प्रकाश जाधव (३५, रा. भातसई, ता. शहापूर, ठाणे) याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने सोमवारी भिवंडी येथून अटक केली. त्याच्या ताब्यातून एक बारा बोअरची रिव्हॉल्व्हरही हस्तगत करण्यात आली आहे.
मुंबई - नाशिक महामार्गावर एक व्यक्ती शस्त्र विक्र ी करण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर आदींच्या पथकाने २१ जून रोजी जाधव याला या पथकाने अटक केली. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर वाशिंद पोलीस ठाण्यात हत्यार बाळगणे आणि विक्र ी प्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत. त्याने हे रिव्हॉल्व्हर कोठून आणि कोणाकडून आणले? याचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.