अमीर घरफोड्याला उत्तरप्रदेशातून अटक
By admin | Published: March 6, 2016 01:38 AM2016-03-06T01:38:19+5:302016-03-06T01:38:19+5:30
यशस्वी व्यावसायिक, पाच वर्षे गावचा सरपंच, प्रतिष्ठित व्यक्ती. मुंबई-अलाहाबाद नेहमी विमानाने प्रवास करणारा चक्क सराईत चोरटा निघाला असून त्याला माणिकपूर पोलिसांनी अलाहाबादहून
वसई : यशस्वी व्यावसायिक, पाच वर्षे गावचा सरपंच, प्रतिष्ठित व्यक्ती. मुंबई-अलाहाबाद नेहमी विमानाने प्रवास करणारा चक्क सराईत चोरटा निघाला असून त्याला माणिकपूर पोलिसांनी अलाहाबादहून
अटक करून त्याचे खरे रुप उजेडात आणले.
अस्लम इस्माईल शेख असे चोरट्याचे नाव असून ११ जानेवारी १६ रोजी माणिकपूर येथील साई नगरात झालेल्या चोरीत शेख सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्यानंतर पीएसआय गणेश शिंदे यांनी त्याची माहिती काढली असता तो सराईत चोर असल्याचे उजेडात आले.
अधिक माहिती घेऊन शिंदे यांनी शेख याच्या उत्तरप्रदेशातील
प्रतापगड जिल्हयातील रामपूर रजवाडा गावात धाड टाकली. पण, पहिल्या धाडीत शेख हाती लागला नाही. त्यानंतर टाकलेल्या धाडीत मात्र शेखला जेरबंद करण्यात पोलिसांनी यश आले.
शेख सराईत गुन्हेगार असून त्याने वसईसह मुंबई, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी परिसरात अनेक घरफोड्या केल्याची माहिती हाती लागली आहे. त्याहीपेक्षा शेखची गावात असलेली प्रतिष्ठा पोलिसांना चक्रावून गेली. शेखने गावी अनेक व्यवसाय सुुरु केले असून त्याच्या दिमतीला दोन-तीन गाड्या आहेत. २०१० ते २०१५ पर्यंत तो गावचा सरपंचदेखिल होता. इतकेच नाही तर शेख मुंबईत घरफोड्या केल्यानंतर गावी निघून जायचा. गावी ये-जा विमानाने करीत असल्याने गावात करोडपती आणि प्रतिष्ठित अशी त्याची प्रतिमा होती. (प्रतिनिधी)