निवडणुकीत रिचवली १०.७४ लाख लीटर व्हिस्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:04 AM2019-04-28T00:04:57+5:302019-04-28T00:05:11+5:30

बीअरची विक्री ९७६४ लीटरने घटली, अमली पदार्थांची मागणी वाढली

Richiwali 10.74 lakh liters whiskey in the elections | निवडणुकीत रिचवली १०.७४ लाख लीटर व्हिस्की

निवडणुकीत रिचवली १०.७४ लाख लीटर व्हिस्की

Next

सुरेश लोखंडे

ठाणे : उन्हाच्या दाहकतेपासून काहीअंशी बचाव व्हावा, यासाठी चिल्ड बीअरला मोठ्या प्रमाणात पसंती असते. मात्र, यंदा उलटेच झाले. बीअरऐवजी लोकांनी व्हिस्कीला अधिक पसंती दिली. निवडणुकीच्या उत्साहपूर्ण वातावरणाची भर पडल्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात गेल्या एका महिन्यातच १० लाख ७३ हजार ९५ लीटर व्हिस्कीची विक्री झाली. मागील वर्षाच्या तुलनेत यामध्ये १२ हजार ६५४ लीटरने वाढ झाली आहे. या एका महिन्यात १७ लाख २७ हजार २१५ लीटर बीअर ठाणेकरांनी रिचवली आहे. मागील वर्षापेक्षा नऊ हजार ७६४ लीटरने तिची विक्री कमी झाली आहे.

उन्हामुळे अवघा महाराष्ट्र व ठाणे जिल्हा होरपळून निघत आहे. या जीवघेण्या तापमानात व्हिस्कीऐवजी बीअरला पसंती मिळणे क्रमप्राप्त होते. पण, तसे न होता उलट झाले. उन्हाची तमा न बाळगता निवडणूक प्रचाराच्या या धामधुमीत बीअर पिणाऱ्यांनी व्हिस्कीला पसंती दिली आणि १२ हजार ६५४ लीटर व्हिस्कीच्या विक्रीत वाढ झाली.
एवढेच नव्हे तर कण्ट्री दारूच्या विक्रीतही वाढ झाली आहे. ३२ हजार लीटरपेक्षा जास्त कण्ट्री दारूची विक्री झाली आहे. त्यातुलनेत मागील वर्षी ३१ हजार ९०० लीटर कण्ट्री दारूची विक्री झाली होती. यास अनुसरून १०० लीटरपेक्षा जास्त कण्ट्री दारू विकल्या गेल्याचे आढळून आले आहे. या पाहणीसाठी ११ मार्च ते २५ एप्रिलपर्यंतच्या या कालावधीची तुलना मागील वर्षाच्या विक्रीशी करून हा अहवाल केला आहे.

5.37 कोटींचे अमली पदार्थ जप्त
ठाणे लोकसभेसह कल्याण, भिवंडी या मतदारसंघांतूनदेखील ३३ लाख ६५ हजार ६६ लीटर अवैध दारू जप्त झाली आहे. यामध्ये हातभट्टीसह कण्ट्री दारू, व्हिस्की, बीअर, ताडी आणि मोहाच्या फुलांची आदी ४० लाख ६९ लाख ६५४ रुपये किमतीची दारू जप्त केलेली आहे.

७९ हजार ४४३ मि. गॅ्रम अमली पदार्थही या काळात जप्त झाले आहे. यांची किंमत सुमारे पाच कोटी ३७ लाख ६९ हजार रुपये असल्याचे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व ठाणे लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पाटील यांनी सांगितले.

निवडणुकीच्या या प्रचार कालावधीत निवडणूक यंत्रणेसह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पाहणी अहवालासह पोलिसांनी कारवाई करून जिल्ह्यातील अवैध दारूसाठा उघडकीस केला आहे.

Web Title: Richiwali 10.74 lakh liters whiskey in the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे