रिक्षा संघटनेमध्ये वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 03:20 AM2018-04-23T03:20:22+5:302018-04-23T03:20:22+5:30

अध्यक्ष पाटील की यादव? : दोघेही शिवसेनेचेच पदाधिकारी

Rickshaw dispute | रिक्षा संघटनेमध्ये वाद

रिक्षा संघटनेमध्ये वाद

Next

उल्हासनगर : शहरातील शहीद मारोती जाधव रिक्षाचालक-मालक संघटनेचा वाद चव्हाट्यावर आला आहे. संघटनेच्या अध्यक्षपदी राजा पाटील की शेखर यादव, असा वाद रंगला असून लोकशाही मार्गाने निवडणूक घेऊन अध्यक्षपदी निवडून आल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.
रिक्षाचालक-मालक संघटनेचा शहरात दबदबा असून शेकडो रिक्षाचालक संघटनेचे सदस्य आहेत. अनेक वर्षांपासून संघटनेतील दोन गट आमने-सामने उभे ठाकले आहेत. पाटील शाखाप्रमुख तर यादव नगरसेवक आहेत. दोन्ही पदाधिकारी शिवसेनेचे असून दोघांत दिलजमाई करण्यास स्थानिक नेत्यांसह वरिष्ठ नेते अपयशी ठरले आहेत. पाटील यांनी १ एप्रिलला स्वामी शांतिप्रकाश सभागृहात रिक्षाचालक-मालकांची सर्वसाधारण सभा बोलावून अध्यक्षपदासह इतर कार्यकारिणीची चर्चा केली. तर, २० एप्रिलला अध्यक्षांसह कार्यकारिणीची निवडणूक होऊन लोकशाही पद्धतीने पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली.
पाटील यांनी संघटनेची कार्यकारिणी जाहीर करून कामगार आयुक्तांसह पोलीस उपायुक्त, संबंधित पोलीस ठाणे यांना तशी प्रत दिली. तसेच ३५० पेक्षा जास्त रिक्षाचालक-मालकांची सदस्ययादी व त्यांची सदस्यपावती दिली. या प्रकाराने संघटनेचे प्रमुख व नगरसेवक यादव यांनी घाईगडबडीत रविवारी दुपारी १ वाजता लालचक्की चौकातील वाघमारे हॉलमध्ये रिक्षाचालक-मालकांची सर्वसाधारण बैठक बोलावली. बैठकीला चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकारी बैठकीनंतर यादव यांची संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले. एकाच संघटनेचे दोन अध्यक्ष झाल्याने संघटनेतील वाद चव्हाट्यावर आला आहे.

लोकशाही पद्धतीने निवड करावी
शेखर यादव हे माझे चांगले मित्र असून आम्ही दोघेही एकाच पक्षात काम करतो. बहुतांश रिक्षाचालक-मालक संघटनेचा पाठिंबा मला असून ३५० पेक्षा जास्त रिक्षाचालक-मालकांनी संघटनेच्या अधिकृत सदस्यपदाच्या पावत्या फाडल्या आहेत, असा दावा त्यांनी केला. शहीद मारोती जाधव रिक्षा संघटनेचे स्वतंत्र अस्तित्व असून अध्यक्षपदाची निवड लोकशाही पद्धतीने होते. कोणत्याही संघटनेचा पदाधिकारी येथे येऊन थेट अध्यक्षपदी नियुक्तीपत्र देत नाही, अशी माहिती पाटील यांनी दिली. संघटना व रिक्षाचालकांच्या हितासाठी सदैव लढणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Web Title: Rickshaw dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे