रिक्षा चालकांची मुजोरी सुरुच, वाहतूक पोलिसाला केली मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 06:47 PM2017-08-11T18:47:39+5:302017-08-11T19:08:10+5:30

रिक्षा रस्त्यावर बेशिस्तपणो उभी करणा-या रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई करणारे वाहतूक पोलिस नामदेव हिमगिरे यांना दोन रिक्षा चालकांनी मारहाण केली आहे. मारहाण करणा-या रिक्षा चालकांची नावे राहूल कारंडे व बाळा ठाकूर अशी आहेत.

Rickshaw driver's compulsion started, traffic police beat up | रिक्षा चालकांची मुजोरी सुरुच, वाहतूक पोलिसाला केली मारहाण

रिक्षा चालकांची मुजोरी सुरुच, वाहतूक पोलिसाला केली मारहाण

Next

कल्याण, दि. 11 - रिक्षा रस्त्यावर बेशिस्तपणो उभी करणा-या रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई करणारे वाहतूक पोलिस नामदेव हिमगिरे यांना दोन रिक्षा चालकांनी मारहाण केली आहे. मारहाण करणा-या रिक्षा चालकांची नावे राहूल कारंडे व बाळा ठाकूर अशी आहेत. पोलिसांनी  रिक्षा चालक कारंडे याला अटक केली आहे. या प्रकारामुळे रिक्षा चालकांची मुजोरी व बेशिस्तपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.
शहराच्या पश्चिम भागातील मोहिंदरसिंग काबूलसिंग या शाळेसमोर दोन रिक्षा चालकांनी बेशिस्तपणे रिक्षा रस्त्याच्या मध्ये उभी केली होती. वाहतूक अडथळा होत असल्याने वाहतूक पोलिस हिमगिरे व वाहतूक नियंत्रणास मदत करणारा ट्रॅफिक वॉर्डन अक्षय उगले हे त्याठिकाणी कर्तव्य बजावित होते. यावेळी रिक्षा चालकाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी हिमगिरे यांनी त्यांचे पावती पुस्तक उघडले. तेव्हा रिक्षा चालकाने त्यांच्या अंगावर दोनशे रुपये फेकून दिले. त्यांची कॉलर धरली आणि मारहाण केली. हा प्रकार दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडला. 
या प्रकरणी पोलिसांनी कारंडे याला अटक केली आहे. अन्य रिक्षा चालक ठाकूर याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार कोणी तरी मोबाईलमध्ये कैद करुन त्याची क्लीप वायरल केली आहे. या क्लीपमध्ये पोलिसही रिक्षा चालकाच्या अंगावर धावून जात असल्याचे दिसून येत आहे असा आरोप रिक्षा चालकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे कोणी कोणाला मारले याविषयी रिक्षा चालकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
 

Web Title: Rickshaw driver's compulsion started, traffic police beat up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.