लसीकरणावरून घरी परतणाऱ्या पित्यासह मुलीला रिक्षाची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:45 AM2021-08-21T04:45:19+5:302021-08-21T04:45:19+5:30
ठाणे : लुईसवाडी येथील महावीर रुग्णालय येथून कोरोना प्रतिबंधक लस घेऊन घरी पायी परतणाऱ्या राजेश गोसर (वय ५३, रा. ...
ठाणे : लुईसवाडी येथील महावीर रुग्णालय येथून कोरोना प्रतिबंधक लस घेऊन घरी पायी परतणाऱ्या राजेश गोसर (वय ५३, रा. शिवाजीनगर, मुलुंड चेक नाका, वागळे इस्टेट, ठाणे) आणि त्यांची मुलगी पंक्ती (२५) यांना एका रिक्षाने पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी (दि. १७) दुपारी घडली. श्रीनगर पोलीस ठाण्यात रिक्षाचालकाविरुद्ध बुधवारी (दि. १८) गुन्हा दाखल झाला..
पंक्ती आणि तिचे वडील राजेश असे दोघेजण मंगळवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास लुईसवाडी महावीर हॉस्पिटल येथून कोरोनावरील लस घेऊन रोड क्रमांक १६ येथून मॉडेला चेक नाक्याच्या दिशेने रस्त्याच्या कडेने पायी जात होते. त्याच वेळी एमआयडीसी मुलुंड चेकनाका येथे त्यांच्या पाठीमागून आलेल्या वसीम अन्सारी यांच्या रिक्षाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात राजेश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून पंक्तीला किरकोळ मार लागला आहे. त्यांना सुरुवातीला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले होते. नंतर मुलुंड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. पंक्तीवर उपचारांनंतर तिने या प्रकरणी १८ ऑगस्ट रोजी श्रीनगर पोलीस ठाण्यात रिक्षाचालकाविरुद्ध तक्रार दिली. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
.............