'त्या' रिक्षा मालकाचा परवाना होणार रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 08:29 PM2019-02-04T20:29:40+5:302019-02-04T20:31:44+5:30

डोंबिवली - मनसे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी शनिवारी एका रिक्षाचालकाला डोंबिवलीत विनापरवाना, कागदपत्रे नसल्याचे वाहतूक नियंत्रण विभागाच्या निदर्शनास आणून ...

The 'rickshaw owner' will not be licensed | 'त्या' रिक्षा मालकाचा परवाना होणार रद्द

'त्या' रिक्षा मालकाचा परवाना होणार रद्द

Next
ठळक मुद्देडोंबिवलीत विनापरवाना, कागदपत्रे नसल्याचे वाहतूक नियंत्रण विभागाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्या संदर्भातील गंभीर नोंद आरटीओ अधिकारी संजय ससाणे यांनी घेतली असून संबंधित वाहनचालकांचे वाहन परवाने कायमसाठी रद्द करण्यात येणार आहेत.

डोंबिवली - मनसे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी शनिवारी एका रिक्षाचालकाला डोंबिवलीत विनापरवाना, कागदपत्रे नसल्याचे वाहतूक नियंत्रण विभागाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतरही तीन दिवसात त्यांनी आणखी तिघा चालकांकडे कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट केले होते. त्या संदर्भातील गंभीर नोंद आरटीओ अधिकारी संजय ससाणे यांनी घेतली असून संबंधित वाहनचालकांचे वाहन परवाने कायमसाठी रद्द करण्यात येणार आहेत.
ससाणे यांनी ही माहिती लोकमतला दिली. ते म्हणाले की, कोणता राजकीय पक्ष या संदर्भात काय पुढाकार घेतो यापेक्षाही असे रिक्षाचालक शहरात असल्याचे आरटीओच्या नीदर्शनास येते त्यावेळीच त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करण्यात आलेली आहे. आरटीओ अधिका-यांनाही काही मर्यादा असून त्यामध्ये प्रामुख्याने अपुरा मनुष्यबळ ही मोठी अडचण आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील सुमारे दिडशे दोनशे रिक्षांची माहिती वाहतूक नियंत्रण विभाग, आरीटीओकडे मिळाली असून लवकरच ते या संदर्भात कारवाईचा धडाका सुरू करणार असल्याचेही सांगण्यात आले. गतवर्षी आरटीओ अधिकाऱ्यांनी रात्री, सकाळी, संध्याकाळी अशा विविध वेळांमध्ये गस्त घातली होती.तसेच नियोजन पुन्हा करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

Web Title: The 'rickshaw owner' will not be licensed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.