रिक्षा चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:27 AM2021-06-24T04:27:10+5:302021-06-24T04:27:10+5:30
--------------------------------------------- लोखंडी जाळी चोरीला डोंबिवली : पूर्वेतील पांडुरंगवाडी येथील आशा उषा सदन याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या स्ट्रक्चर फाउंडेशनसाठी ठेवलेल्या ८६ ...
---------------------------------------------
लोखंडी जाळी चोरीला
डोंबिवली : पूर्वेतील पांडुरंगवाडी येथील आशा उषा सदन याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या स्ट्रक्चर फाउंडेशनसाठी ठेवलेल्या ८६ हजार रुपयांच्या लोखंडी जाळ्या चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवार ते सोमवार या कालावधीत घडली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात दुष्यंत सिंग यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे.
------------------------------------------------
सोनसाखळी चोरी
कल्याण : पूर्वेतील जुने कोळसेवाडी पोलीस ठाण्यासमोरील चाळीच्या गल्लीतून ग्रेसी हाइट घरी जात असताना समोरून आलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील १५ हजार ८४० रुपये किमतीची सोन्याची चेन खेचून पलायन केले. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
-----------------------------------------------
घरफोडी करून दागिने लंपास
कल्याण : पूर्वेतील विजयनगरमधील शांतिधाम चाळीत राहणारे महेंद्र तपासे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी लोखंडी कपाटातील लॉकरमधील दाेन लाख ७४ हजार ३४५ रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना बुधवार ते शनिवार या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी तपासे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
--------------------------------------------------
कार चोरीला
कल्याण : पश्चिमेतील खडकपाडा माधव संकल्प बिल्डिंगच्या बाहेर रस्त्याच्या कडेला कार उभी केली होती. तेथून ती गाडी चोरीला गेल्याची घटना शनिवार ते सोमवार या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी स्वर्णलक्ष्मी सोमयाजुला हिने खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला आहे.
---------------------------------------------
दुचाकी चोरीला
डोंबिवली : शिवजी जेठा यांनी त्यांची दुचाकी पूर्वेतील चित्तरंजनदास रोडवर पार्क केली होती. तेथून ती गाडी चोरीला गेल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
------------------------------------------------
कोरोनाचे नवे १२३ रुग्ण
कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील बुधवारी नव्या १२३ कोरोनाबाधितांची भर पडली आहे. रुग्णालयात दाखल असलेले ९८ रुग्ण उपचाराअंती बरे झाल्याने त्यांना डिस्जार्ज देण्यात आला आहे, तर नव्या रुग्णांची भर पडल्याने सध्या एक हजार १८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासांत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजमितीला केडीएमसीच्या हद्दीत एक लाख ३५ हजार ७२४ रुग्ण आढळून आले आहेत, तर एक लाख ३१ हजार ९५६ इतके रुग्ण बरे झाले आहेत.
------
जमिनी बळकावल्या : ८ जुलैला आंदोलन
डोंबिवली : विकासकाने शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून त्यांच्यावर अन्याय केल्याच्या निषेधार्थ पीपल्स रिपब्लिकन पक्ष ८ जुलैला जनआंदोलन छेडणार आहे. पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखाली हाेणाऱ्या या आंदोलनाची दखल न घेतल्यास शेतकरी विकासकाच्या निवासस्थानी आत्मदहन करतील, असा इशारा शेतकरी बचाव समितीने दिला आहे.
-------------------------------------------------