रिक्षा चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:25 AM2021-07-09T04:25:49+5:302021-07-09T04:25:49+5:30

--------- कल्याणमध्ये घरात चोरी, दागिने लंपास कल्याण : आरती मसराम या त्यांच्या आईसोबत भायखळा येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये असताना कल्याण ...

Rickshaw theft | रिक्षा चोरी

रिक्षा चोरी

Next

---------

कल्याणमध्ये घरात चोरी, दागिने लंपास

कल्याण : आरती मसराम या त्यांच्या आईसोबत भायखळा येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये असताना कल्याण पूर्वेतील आनंदवाडी येथील त्यांच्या घरी चोरी झाल्याचा प्रकार २३ मे च्या मध्यरात्री घडला आहे. परंतु, त्याची तक्रार त्यांनी बुधवारी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली. घरातून ५५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत.

----------------------------------------

दुचाकी चोरी

डोंबिवली : ऋषिकेश भागवत यांनी त्यांची दुचाकी सोमवारी पूर्वेतील एमआयडीसी विभागातील यश जिमखान्याच्या गेटच्या बाहेर कडेला उभी केली होती. तेथून ती गाडी चोरीला गेली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

------------------------------

घरफोडीत सव्वा लाखांचे दागिने चोरीला

डोंबिवली : पश्चिमेतील पंडित दीनदयाळ रोडवरील सुखशांती बिल्डिंगमध्ये राहणारे विक्रांत काळे यांचे घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील १ लाख २६ हजार २०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी सकाळी १० ते ११.३० च्या दरम्यान भरदिवसा घडली. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

-------------

मोटारीची दुचाकीला धडक

कल्याण : राजेश बजागे हे दुचाकीवरून बुधवारी सकाळी ८ वाजता शहाड येथील सेंच्युरी रेयॉन कंपनीत कामावर जात होते. सहजानंद चौकात त्यांच्या दुचाकीला काळा तलाव बाजूकडून भरधाव आलेल्या मोटारीची जोरदार धडक बसली. यात राजेश यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी मोटारचालक रमेश कांडविलकर यांच्याविरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

-----------------------------------------

वादातून ब्लेडचे वार

डोंबिवली : पत्ते खेळताना झालेल्या वादातून अक्षय आणि आकाश सोनवणे या दोघा बंधूंनी सचिन डावरे याला मारहाण करीत त्याच्यावर ब्लेडने पाच ते सहा वार केले. ही घटना बुधवारी रात्री ८ वाजता आयरेगाव, ज्योतीनगर झोपडपट्टीत घडली. यात अन्य एक साथीदार भोजराज हा देखील जखमी झाला आहे. याप्रकरणी रेवनाथ अहिरे याच्या तक्रारीवरून अक्षय आणि आकाशविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

----------------

Web Title: Rickshaw theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.