रिक्षाचे टायर चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:42 AM2021-04-02T04:42:57+5:302021-04-02T04:42:57+5:30

------------------------------------------- जवाहिराच्या पेढीत चोरी कल्याण : मोहने येथील किशोर ज्वेलर्स या दुकानाची भिंत तोडून चोरट्यांनी त्यावाटे आत प्रवेश करून ...

Rickshaw tires stolen | रिक्षाचे टायर चोरीला

रिक्षाचे टायर चोरीला

Next

-------------------------------------------

जवाहिराच्या पेढीत चोरी

कल्याण : मोहने येथील किशोर ज्वेलर्स या दुकानाची भिंत तोडून चोरट्यांनी त्यावाटे आत प्रवेश करून दुकानातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा ४३ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी ज्वेलर्स दुकानाचे मालक अरविंद जैन यांनी दिलेल्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

--------------------------------------------

शिवीगाळी आणि मारहाण

कल्याण : भिवंडी येथे राहणारे राजेंद्र बंडगर हे दुधाची डिलिव्हरी करण्यासाठी मंगळवारी पहाटे गाडीने उल्हासनगरकडे जात असताना वालधुनी येथे चार अनोळखी व्यक्तींनी शिवीगाळी आणि मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील ९५० रुपये आणि एटीएम कार्डसह अन्य महत्त्वाची कागदपत्रे जबरीने काढून घेत पलायन केले. या प्रकरणी बंडगर यांच्या तक्रारीवरून महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

----------------------------------------------

पोलीस असल्याचे सांगत लूट

कल्याण : राजू खान हे मंगळवारी सकाळी वल्लीपीर रोडवरील त्यांच्या साधना हॉटेलसमोरील मौलाना जनरल स्टोअर्स नावाच्या दुकानात होते. त्या वेळी दोघे जण त्यांच्या दुकानात आले. आम्ही ठाणे क्राइम ब्रँच येथून आल्याचे सांगत दोघांनी राजू यांना मारहाण केली. पोलीस ठाण्यात चल, असे म्हणून एक मोबाइल आणि सिगारेटचे पाकीट असा २१ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन गेल्याचा प्रकार घडला. याबाबत राजू यांनी महात्मा फुले चौक पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

---------------------------------------------------

९६ लाखांची फसवणूक

डोंबिवली : पूर्वेकडील आनंदनगर परिसरात राहणारे दिनेश गायकवाड यांच्या बँक खात्यातून बनावट चेकच्या आधारे एका अनोळखी व्यक्तीने ९६ लाख ८७ हजार ९१० रुपये काढून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी घडला. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

----------------------------------------------------

Web Title: Rickshaw tires stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.