माहिती अधिकार कार्यकर्त्यांना समन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:47 AM2018-03-29T00:47:58+5:302018-03-29T00:47:58+5:30
मागील कित्येक दिवसांपासून माहिती अधिकार कार्यकर्त्यांबाबत पालिकेने पोलिसांना दिलेल्या अहवालावरून अनेक संभ्रम निर्माण झाले होते.
ठाणे : मागील कित्येक दिवसांपासून माहिती अधिकार कार्यकर्त्यांबाबत पालिकेने पोलिसांना दिलेल्या अहवालावरून अनेक संभ्रम निर्माण झाले होते. परंतु, आता पालिकेने दिलेल्या अहवालानुसारच त्यांना पोलिसांनी समन्स बजावून चौकशीही सुरू केली आहे.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातील वादग्रस्त माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या विरोधातील लक्षवेधी सूचना विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मांडली होती. त्यावर पालिकेने आपले उत्तर सरकारला सादर केले होते. याप्रकरणी चौकशी करून दोषी आढळणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. त्यानंतर, सरकारने ठाणे पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करावी, असे आदेश दिले.
आयुक्त परमबीर सिंग यांनी ही चौकशी खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्याकडे सोपवली आहे. त्यानुसार, ठाणे महापालिकेने ८ मार्च रोजी माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा १२७३ पानांचा अहवाल सादर केला होता. त्यानुसार, आता ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने १० जणांना समन्स पाठवले आहे.