रिकामवाडी, फणसवाडीतील विहिरी कोरड्याठाक, अपूर्ण पाणीयोजनेचा करपटवाडीला फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 01:10 AM2019-05-06T01:10:33+5:302019-05-06T01:10:52+5:30

ठाणे जिल्ह्यातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र टाकेश्वर देवस्थानापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या करपटवाडी, फणसवाडी, रिकामवाडी तसेच उंबरवाडी या आदिवासी पाड्यांना तीव्र पाणीटंचाईने घेरले आहे.

Rikmwadi, Fansawadi wells dry | रिकामवाडी, फणसवाडीतील विहिरी कोरड्याठाक, अपूर्ण पाणीयोजनेचा करपटवाडीला फटका

रिकामवाडी, फणसवाडीतील विहिरी कोरड्याठाक, अपूर्ण पाणीयोजनेचा करपटवाडीला फटका

Next

- वसंत पानसरे
किन्हवली - ठाणे जिल्ह्यातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र टाकेश्वर देवस्थानापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या करपटवाडी, फणसवाडी, रिकामवाडी तसेच उंबरवाडी या आदिवासी पाड्यांना तीव्र पाणीटंचाईने घेरले आहे. दिवसाआड येणाºया टँकरचे पाणी मिळवण्यासाठी येथील महिला - पुरूषांची झुंबड उडत असल्याचे चित्र आहे. फणसवाडी आणि रिकामवाडीतील आटलेल्या विहिरींमध्ये तळाला साठणारे झºयाचे पाणी भरण्यासाठी महिला रात्रभर जागरण करत असल्याची परिस्थिती आहे.

सुमारे अडीचशे - तीनशे लोकवस्ती असलेल्या ढाढरे ग्रामपंचायत क्षेत्रातील रिकामवाडी आणि फणसवाडी या पाड्यांवर जवळपास ४ विहिरी असून त्या सर्वांनीच मार्च अखेरपासून तळ गाठला आहे. फणसवाडीत दोन किमीवर असलेल्या एका विहिरीत जिवंत झºयामुळे थोडेथोडे पाणी पाझरत राहते. मात्र, हे पाणी भरण्यासाठी बायका दिवसभर नंबर लावून बसलेल्या दिसतातच पण रात्रीही त्यांना जागरण करावे लागते. वाडीतील खाजगी बोरवेल बंद पडल्या असून एका सेवाभावी संस्थेने मारलेली एक बोरवेल सुरू असली तरी त्यातूनही जेमतेमच पाणी उपलब्ध होत असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्या सुनिता गावंडा यांनी दिली.

येथील एका कोरड्या विहिरीत शहापूर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागामार्फत दिवसाआड अर्धा टँकर टाकला जातो. मात्र, रिकामवाडी, फणसवाडी आणि उंबरवाडी अशा तीन पाड्यांतील जवळपास ५०० लोकसंख्येला हे पाणी एक दिवसही पुरत नाही. दिवसरात्र फक्त पाणी टिपून आणण्याचेच काम करावे लागत असून पाण्याची विवंचना सुखाचे दोन घासही गोड लागू देत नसल्याची खंत स्थानिक महिला जनीबाई हिंदोळा यांनी व्यक्त केली.

पाणीपुरवठा विभागाने राबवलेली नळपाणीपुरवठा योजना दोन वर्षांपासून बंद असून ती पूर्ववत सुरू करण्यासाठी कोणतीही पावले प्रशासनाकडून उचलली जात नसल्याने आदिवासी बांधव नाराजी व्यक्त करत आहेत. दरम्यान, काही स्थानिक चोरट्यांनी या पाणीयोजनेचे पाईप चोरून नेले असल्याने योजना बंद असल्याची माहिती मिळाली. करपटवाडीसाठी प्रस्तावित पाणीयोजना अर्धवट असल्याने तेथील आदिवासींनाही पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे शौचालये असूनही वापरली जात नाहीत. या भागात मोठ्या प्रमाणात शेळीपालन केले जात असून या शेळ्या - बकºया आणि गुरांना पाणी पाजण्यासाठी सहा - सात किमी. अंतरावर असलेल्या शाई नदीपात्रात घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे कधी एकदाचा पाऊस येतो आणि फरफट थांबते, अशी आदिवासींची अवस्था झाली आहे.

करपटवाडीची अर्धवट पाणीयोजना आणि बंद पडलेली फणसवाडी -रिकामवाडीची योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न झाल्यास पाणीटंचाईतून दिलासा मिळू शकतो.
- सुनिता ल.गावंडा, सदस्या, ढाढरे ग्रामपंचायत
या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तसेच ग्रामस्थांनी पाण्याच्या टँकरची मागणी केली आहे. तो प्रस्ताव वरिष्ठांना पाठवून तातडीने त्या ठिकाणी टँकरने जास्त फेºया मारून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाईल.
- एम. आव्हाड,
उपाभियंता पाणीपुरवठा, पं. समिती शहापूर
 

Web Title: Rikmwadi, Fansawadi wells dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.