‘रिंगरोड’ला अडथळा घनकच-याच्या डोंगराचा : एमएमआरडीएची हटवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 01:44 AM2017-11-16T01:44:20+5:302017-11-16T01:44:33+5:30

कल्याण-डोंबिवलीच्या वाहतुकीच्या प्रश्नावर तोडगा महणून हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी रिंगरोड प्रकल्पाला आधारवाडीतील कच-याचा डोंगर आडवा आला आहे.

 'Ring Road' on the hill of obstacle cluster: The demand for the removal of MMRDA | ‘रिंगरोड’ला अडथळा घनकच-याच्या डोंगराचा : एमएमआरडीएची हटवण्याची मागणी

‘रिंगरोड’ला अडथळा घनकच-याच्या डोंगराचा : एमएमआरडीएची हटवण्याची मागणी

Next

मुरलीधर भवार 
कल्याण : कल्याण-डोंबिवलीच्या वाहतुकीच्या प्रश्नावर तोडगा महणून हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी रिंगरोड प्रकल्पाला आधारवाडीतील कच-याचा डोंगर आडवा आला आहे. कचरा हटवून रस्त्यासाठी जागा मोकळी करून द्या, अशी मागणी करून एमएमआरडीएने हा विषय पालिकेच्या गळ््यात घातला आहे. पण हा कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न पालिकेला पडला आहे.
या प्रकल्पाच्या निविदा काढून दुर्गाडी ते टिटवाळा या पट्ट्यात कामाला सुरुवात झाली आहे. घनकचरा प्रकल्पाच्या जनसुनावणीत नागरिकांनी उंबर्डे, बारावे, मांडा येथील प्रकल्पांना तीव्र विरोध केल्याने आधारवाडीचा कचºयाचा डोंगर कुठे हलवायचा हा प्रश्न आहे. डम्पिंगची क्षमता संपूनही कल्याण-डोंबिवली पालिका आधारवाडीत कचरा टाकते आहे. या प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादापुढे सुनावणी सुरु आहे. तीन वर्षात हे डम्पिंग हटवण्याचे प्रतिज्ञापत्र पालिकेने तेथे सादर केले आहे. आधारवाडीचे डम्पिंग बंद करण्यासाठी बारावे व उंबर्डे येथे अनुक्रमे २५० व ३५० मेट्रिक टनांचा घनकचरा प्रकल्प प्रस्तावित केला.
त्यासाठी निविदा काढल्या. संबंधित कंत्राटदाराला काम सुरु करण्याचे आदेश दिले. पण जनसुनावणी न घेतल्याने त्याला लवादाने पर्यावरण ना हरकत दाखला दिलेला नाही. पण जनसुनावणीत नागरिकांनी तीव्र विरोध केल्याने तूर्त आधारवाडीतच कचरा टाकणे सुरू आहे. आधारवाडीतील कचºयावर प्रक्रिया करणारा कंत्राटदार नागरिकांच्या विरोधामुळे अनामत रकमेवर पाणी सोडून पळून गेला.
12
लाख मेट्रिक टन
कचरा हटवणे गरजेचे
आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर सध्या १५ लाख घनमीटर मेट्रिक टन कचरा आहे. तेथे कचºयाचा २५ मीटरचा डोंगर आहे. या कचºयाच्या डोंगरात महापालिकेचे जुने एसटीपी गाडले गेलेले आहे. क्षमता संपूनही पालिका तेथे दररोज ६०० मेट्रिक टन कचरा टाकते आहे. एमएमआरडीने महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार रिंगरोड प्रकल्पाची निविदा काढून प्रकल्पाचे काम सुरु केले आहे. दुर्गाडी ते गांधारे येथील काम सुुरू आहे. या मार्गात आधारवाडी डम्पिंगच्या कचºयाचा डोंगर आहे. त्यातील १२ लाख मेट्रिक टन कचरा दूर केल्याशिवाय हा मार्ग बांधणे कठीण आहे.

Web Title:  'Ring Road' on the hill of obstacle cluster: The demand for the removal of MMRDA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.