वीजपुरवठा खंडित करण्यास रिपाइंचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:15 AM2021-03-04T05:15:29+5:302021-03-04T05:15:29+5:30
ठाणे : रामनगर येथे वीजमीटर कापण्यास गेलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना रिपाइं (आ) च्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी प्रचंड विरोध केला. त्यामुळे ...
ठाणे : रामनगर येथे वीजमीटर कापण्यास गेलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना रिपाइं (आ) च्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी प्रचंड विरोध केला. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यास आलेले अधिकारी रिकाम्या हाताने परतले.
मंगळवारी सायंकाळी सीपी तलाव, रामनगर येथे महावितरणचे काही अधिकारी आणि कर्मचारी दोन ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेले होते. ही माहिती मिळताच रिपाइंचे युवा नेते अशोक कांबळे यांनी सदर ठिकाणी धाव घेऊन कोरोनाकाळात लोकांना पोट भरण्याची भ्रांत आहे. अशा काळात पाठविलेले हे वीजबिल ग्राहक कसे काय भरतील, असा प्रश्न करून वीजमीटर कापण्यास विरोध केला. यावेळी रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद मगरे यांच्यासह अशोक कांबळे यांच्या कार्यालयात अधिकारी आणि रिपाइं कार्यकर्ते यांच्यात बैठक झाली. त्यावेळी महावितरणने जर मीटर कापले तर रिपाइं रस्त्यावर उतरेल; महावितरणने गुन्हा दाखल केला तरी आमचा विरोध कायम असेल, असा इशारा दिला.