रिपाइंने डोंबिवलीत केला राज्य सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:38 AM2021-05-15T04:38:20+5:302021-05-15T04:38:20+5:30
डोंबिवली : सरकारी नोकरीत पदोन्नतीमधील आरक्षण सेवाज्येष्ठतेनुसार करण्याचा अध्यादेश राज्यातील महाविकास आघाडी सरकारने काढला आहे. त्यामुळे प्रशासनातील पदोन्नतीमधील मागासवर्गीयांची ...
डोंबिवली : सरकारी नोकरीत पदोन्नतीमधील आरक्षण सेवाज्येष्ठतेनुसार करण्याचा अध्यादेश राज्यातील महाविकास आघाडी सरकारने काढला आहे. त्यामुळे प्रशासनातील पदोन्नतीमधील मागासवर्गीयांची राखीव ३३ टक्के पदे ही आता खुल्या पद्धतीने भरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार डोंबिवलीमध्येदेखील पक्षाचे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी या निर्णयाचा निषेध केला.
याबाबतचे पत्र त्यांनी रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांना दिले आहे. त्यापत्रात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणाकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. हा निर्णय मागे घेतला नाही तर राज्यव्यापी आंदोलन करू, असा इशाराही दिला आहे.
----------