रिपाइंच्या बालेकिल्ल्याला भगदाड

By admin | Published: January 12, 2017 07:04 AM2017-01-12T07:04:26+5:302017-01-12T07:04:26+5:30

सुभाष टेकडी परिसर हा उल्हासनगरमधील आंबेडकरी चळवळीचा केंद्रबिंदू मानला जातो.

Ripai's Cemetery Breakthrough | रिपाइंच्या बालेकिल्ल्याला भगदाड

रिपाइंच्या बालेकिल्ल्याला भगदाड

Next

उल्हासनगर : सुभाष टेकडी परिसर हा उल्हासनगरमधील आंबेडकरी चळवळीचा केंद्रबिंदू मानला जातो. मात्र गेल्या निवडणुकीत बसप, काँग्रेसने रिपाइंच्या या बालेकिल्याला भगदाड पाडले. सहा नगरसेवक निवडून येत असल्याने महत्त्वाच्या ठरलेल्या रिपाइंच्या विविध गटांनी बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी पुन्हा कंबर कसली असून राजकीय समीकरणे जुळवण्यास सुरूवात केली आहे.
येथील समस्या कमी न होता उलट वाढल्याचा दावा त्यांनी केल्याने एकीकडे पुन्हा ताबा मिळवण्यासाठी रिपाइंचा संघर्ष, त्याचवेळी अस्तित्व टिकवण्यासाठी बसप, काँग्रेस यांची निकराची लढाई होण्याची दाट चिन्हे आहेत.
सुभाष टेकडीचा परिसर नेहमी रिपाइंचा बालेकिल्ला राहिला आहे. येथून विविध रिपाइं गटाचे उमेदवार निवडून आले. मात्र पाणी, रस्ते, तुंबलेली गटारे, साफसफाई आदी मुलभूत समस्या ‘जैसे थे’ राहिल्याने मतदारांनी रिपाइंच्या उमेदवारांना नाकारले. परिसरातील मुलभूत समस्या काही प्रमाणात सुटतील, या अपेक्षेने त्यांनी आपला राजकीय कल बदलला. मात्र पाच वर्षानंतरही समस्या तशाच आहेत. नवीन प्रभाग रचनेनुसार साईनगर, आंबेडकर चौक परिसर शेजारच्या प्रभागात समाविष्ट झाला आहे. हा बालेकिल्ला हाती येण्यासाठी ऐक्याची हाक होती. मात्र त्याला यश आलेले नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Ripai's Cemetery Breakthrough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.